बॉलिवूड अभिनेत्री व बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान हिने चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. खानने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिला मुलगा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर आता ६ जानेवारी रोजी सनाने आणखी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. (sana khan become mother)
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सनाने लिहिले आहे की, “अल्लाह तालाने नशिबात सर्व काही लिहिले आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा अल्लाह आपल्याला सर्व काही पुरवतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तो आनंदाने आपली झोळी भरतो. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या मुलाच्या पाठीशी कायम राहो”. अलीकडेच सनाने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक ब्लॉगही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास दाखवला होता.
आणखी वाचा – Video : उमेश कामतने खरेदी केली महागडी दुचाकी, पहिल्यांदाच व्लॉगही केला शूट, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
सना खानच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचे तर, ती ‘बिग बॉस ९’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर तिने चित्रपटामध्ये काम करण्याचं ठरवलं. सना खान ‘बिग बॉस ६ (२०१२) मध्ये दुसरी रनर अप होती. यानंतर ती ‘हल्ला बोल’, ‘जय हो’ आणि ‘आवाज तुम हो’ या चित्रपटांमध्ये दिसली. सनाने ‘झलक दिखला जा ७’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ६’ सारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला.
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर ‘मुफासा : द लायन किंग’ ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी व कुठे पाहता येणार?
दरम्यानच्या काळात सना खानचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. तिचं २०२० मध्ये आयुष्यंच पूर्णपणे बदललं. तिने धर्मासाठी इंडस्ट्री सोडली. अभिनेत्री सना खानने सध्या इंडस्ट्री सोडली असली तरीही ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या व्हिडिओंची आणि फोटोंची सोशल मीडियावर कायमच चर्चा होते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.