दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हा नेहमी चर्चेत असतो. मनोरंजन क्षेत्रांबद्दल अनेक खुलासे तो करत असतो. अशातच एक नवीन खुलासा त्याने केला आहे ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. यामध्ये त्याने एका अभिनेत्याला चित्रपटातून काढल्याची घोषणा केली असून त्याने नक्की असं का केलं? यांचे कारणदेखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे. विवेकच्या सोशल मीडिया पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतानादेखील दिसून येत आहे. त्यामुळे आता नक्की अभिनेता कोण आणि त्यामागील कारण काय? याकडे सगळ्यांकडे लक्ष लागून राहिले आहे. हे नक्की प्रकरण काय? हे जाणून घेऊया. (vivek agnihotri viral post)
विवेकने सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याच्या मॅनेजरवर खूप आरोपदेखील केले आहेत. याबद्दल त्याने ‘X’ म्हणजे ट्विटर हँडलवर लिहिले. तसेच कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडाने सोशल मीडियावर या प्रकरणी पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. मुकेशने पोस्टमध्ये लिहिले की, “चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था-एक अभिनेता, २०० कास्टिंग दिग्दर्शक आणि मॅनेजर १५,६८०”. त्याची पोस्ट रि-ट्विट करत विवेकने लिहिले की, “मला मागच्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढावं लागलं. कारण त्याचा मॅनेजर खूप गर्विष्ठ होता”.
पुढे त्याने लिहिले की, “तो असा काही वागत होता जसं काय एखाद्या मोठ्या अभिनेत्याचा स्टार कीड टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी असून असं करणं त्याचा अधिकारच आहे. या माणसाने करियर बनवण्याऐवजी बिघडवलं आहे. एक वर्कशॉप घ्या आणि या मुलांना शिक्षण द्या”.
दरम्यान विवेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो ‘द दिल्ली फाइल्स’मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर त्याचा ‘पर्व’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका कन्नड भाषेतील पुस्तकावर आधारित असणार आहे. तसेच याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती.