Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अरबाज पटेल नॉमिनेट होऊन बाहेर पडला. यामुळे निक्कीला मोठा धक्का बसला. निक्की यातून स्वत:ला सावरतच होती तेवढ्यात तिला आणखी एक धक्का मिळाला आहे.’बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकत्र गेम खेळत आहेत. त्यांच्यात थोड्या कुरबुरी झाल्या पण नंतर ते पुन्हा एकत्र येऊन खेळले. निक्कीने अरबाजबरोबरची तिची मैत्री मनापासून निभावली. अबरबाजनेही मैत्रीचे नाते जपले. पण आता या मैत्रीच्या नात्यात मिठाचा खडा पडला. कारण निक्कीला अरबाजबद्दलचं माहित नसलेलं मोठं सीक्रेट कळलंय जे तिच्या जिव्हारी लागलं आहे. (Arbaz Patel Relationship Ended)
‘बिग बॉस मराठी’च्या शुक्रवारच्या भागात निक्कीला भेटायला तिचे आई-वडील आले होते. यावेळी निक्कीच्या आईने तिला अरबाजबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे तिला धक्का बसला. निक्कीच्या आईने बाहेर अरबाजच्या साखरपुडा झाल्याच्या चर्चा होत आहेत असं सांगितलं. आईने तिला अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने त्याच्याबरोबरचं तिचं नातं संपवलं असल्याचेही म्हटलं. यानंतर स्वत: अरबाजने यावर भाष्य केलं. अरबाजने त्याच्या इन्स्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनेलद्वारे “माझा साखरपुडा झालेला नाही किंवा माझं लग्नही झालेलं नाही. या सगळ्या अफवा आहेत. यावर विश्वास ठेवू नका” असं म्हटलं होतं.
अशातच त्याने पुन्हा एकदा या सगळ्यावर भाष्य केलं आहे. “टेलिमसाला’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने असं म्हटलं की, “हो! मी पाहिला तो व्हिडीओ… पहिली गोष्ट मलाच माहीत नाही की, माझा साखरपुडा झाला आहे. निक्की पण ‘बिग बॉस’च्या घरात आहे. त्यामुळे तिलाही याबद्दल काही कल्पना नसेलच. पण निक्कीच्या आईने घरात जाऊन तिला हे असं का सांगितलं हेसुद्धा मला माहीत नाही. मी ही गोष्ट सांगितली होती की मी कमिटेड आहे. पण बाहेर आल्यावर सर्व काही गोष्टी बदलतात”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही बघितलं आहे, माझ्या आयुष्यात आता जे काही चाललं आहे, ते सगळं सोडून मी पुढे जाणार आहे आणि नवीन गोष्टी करणार आहे. मी जे कमिटेड होतो तेही मी आता नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. मला आता या सगळ्यात राहायचं नाही”. दरम्यान, या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती, भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचे कबूल केल्यानंतरही त्याची निक्कीबरोबर जवळीक होती