गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

व्यवसाय करत नवऱ्याला दिली साथ, काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय अन्…; अभिजीत सावंतने सांगितली लव्हस्टोरी

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 28, 2024 | 3:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Singer Abhijeet Sawant shares a romantic video of his love story

Bigg Boss Marathi 5 मधील अभिजीत सावंतची हटके लव्हस्टोरी माहीत आहे का? गायकाने शेअर केला खास व्हिडीओ

२००४ साली भारतात टेलिव्हिजनवर एक सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो आला होता. त्या शोचं नाव होतं इंडियन आयडॉल. अमेरिकन टीव्ही शो अमेरिकन आयडॉलच्या धर्तीवरच या शो ची निर्मिती करण्यात आली होती. आणि या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता होता महाराष्ट्राचा अभिजीत सावंत. या शोच्या माध्यमातून मुंबईच्या अभिजीतचा आवाज देशभरात पोहोचला. हा टीव्ही शो तर अख्या भारतभर तुफान हिट ठरला होता. तो विजेता झाला आणि लगेचच काही दिवसांत त्याचा ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ नावाचा नवीन अल्बम आला. लोकांनी तो अल्बमही अक्षरशः डोक्यावर घेतला. त्याच्या गाण्याने त्याला केवळ प्रसिद्धीच नाही तर अनेक संधी सुद्धा मिळवून दिल्या. (Abhijeet Sawant Lovestory)

एकेकाळचा हा आयडॉल मध्यंतरी मात्र प्रसिद्धी झोतापासून खूपच दूर राहिला. त्यामुळे तो नक्की कुठे गेला? याबद्दलच्या अनेक चर्चा सर्व माध्यमांमध्ये झाल्या  होत्या. अशातच त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एण्ट्री घेतली आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. या घरातील त्याच्या खेळाचे व स्वभावाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे, इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तोच या पर्वाचा विजेता होणार अशा चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अशातच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि यामध्ये त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या लव्हस्टोरीमध्ये असे अनेक वेगवेगळे क्षण आले. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हा आम्ही एकत्र अभ्यास घ्यायचो. अनेकदा ती माझा अभ्यास घ्यायची. ती मला शिकवायची. तेव्हापासूनच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमची लव्हस्टोरी हळहळू सुरु झाली. तेव्हा तिला मी पहिले गिफ्ट ही गाण्यांची कॅसेट दिली होती. माझ्या आवडीच्या त्यावेळच्या दहा रोमॅंटिक गाण्यांची कॅसेट तिला मी गिफ्ट म्हणून दिली होती”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “शोमधून आल्यानंतर रिलेशनच संपवलं”, अरबाज पटेलचा युटर्न, गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केल्याचं भाष्य, म्हणाला, “निक्कीला आता…”

तसंच या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आमच्या लव्हस्टोरीची सुरुवात आमच्या कॉलनीमध्ये झाली. बरेच किस्से आहेत. पण त्यातला माझा एक आवडीचा क्षण हा आहे…शिल्पा नेहमीच माझा एक खंबीर पाठिंबा म्हणून राहिली आहे…. आमची लव्हस्टोरी हळूहळू रंजक होत गेली आणि आमचे एकमेकांवरील प्रेम हे प्रत्येकवेळी अधिक घट्ट होतं गेले”. दरम्यान या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व  कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  

आणखी वाचा – “आर्थिक-समाजिक समानता लोकशाही देऊ शकली नाही पण…”, सूरजबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “एका शोने त्याला…”

अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर-सावंत असं आहे. शिल्पा यांचा अस्मी या नावाने केकचा बिझनेस आहे. याची माहिती त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलेली आहे. शिवाय अस्मि या नावाने त्यांचं एक वेगळं इन्स्टाग्राम अकाउंट आहे. यामध्ये त्यांनी बनवलेले स्वादिष्ट, सुंदर थीम केक पाहायला मिळत आहेत. हे सुंदर केकची ती ऑनलाईन ऑर्डरही स्वीकारते.        

Tags: abhijeet sawantAbhijeet Sawant Lovestorybigg boss marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 After Rakhi Sawant, Abhijeet Bichukale, ex contestant Anil Thatte also enter in the house

Bigg Boss च्या घरात अनिल थत्तेंची जोरदार एन्ट्री, निक्कीमुळेच शो चालत असल्याचा केला दावा, वर्षा उसगांवरांना बघताच म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.