बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरवर जबरदस्त कमाई केली होती. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पोलिसांच्या विश्वाचा एक भाग आहे. यामध्ये सर्व कलाकार पोलिसांच्या भूमिकेत दिसून आले होते. अजय बाजीराव सिंघमची भूमिका साकारत आहे तर दीपिकाने ‘लेडी सिंघम’ची भूमिका साकारली होती. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव किंवा ‘सिम्बा’चा रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’चा वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारही जबरदस्त भूमिकेमध्ये दिसून आले होते. (singham again ott release)
‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेंटवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता हा चित्रपट या ठिकाणी दिसत नसल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? हे आपण आता जाणून घेऊया. ‘सिंघम’च देशभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र ‘१२३ तेलुगू’च्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कॅटलॉगमध्ये चित्रपट दिसत आहे. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्राइमवर चित्रपट हटवण्यात आल्याचे बोलले गेले. मात्र आता याबद्दल निर्माते किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने अधिकृत घोषणा केली असून उद्या म्हणजे २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर बघायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.
‘सिंघम अगेन’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण देशभरात या चित्रपटाने २४७.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच जगभरात ३७२ रुपयांची कमाई केली आहे. मात्र अजय देवगणचा चित्रपट प्रेक्षकांचे खास मनोरंजन करु शकला नाही असे अनेकांनी म्हंटले आहे