बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या स्वभावामुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार होतो. काही कलाकार खूप उद्धट असतात तर काही कलाकार इतरांशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागतात. त्यातीलच एक आपुलकीने व प्रेमाने वागणाऱ्या कलाकारांमध्ये जॅक श्रॉफ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या ६७ व्या वर्षीदेखील त्यांचा काम करतानाचा तोच उत्साह बघायला मिळतो. दिवाळीदरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये साकारलेली त्यांची भूमिका खूप लक्षवेधी ठरली. मात्र सध्या ते कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. (jackie shroff viral video)
काही दिवसांपूर्वी जॅकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये त्यांनी शाहरुखची मुलगी सुहानाला पापाराझीच्या गरड्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. अशातच आता त्यांचा दूसरा एक व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी एका चाहत्याची मदत केली. एक चाहता त्यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी समोर आला तिथे त्याचा तोल गेला आणि खाली पडला. मात्र जॅकी यांनी त्याला हात देऊन उठण्यासाठी मदत केली. तसेच नंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्यांना बाय करून निघून गेले.
जॅकी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “त्या व्यक्तीला जास्त लागलेलं नसुदे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “सर तुम्हाला सलाम”, तसेच अजून एकाने लिहिले की, “जॅकी यांनी त्यांच्या गाडीमध्ये पण झाड लावलं आहे”. दरम्यान सोशल मीडियावर जॅकी यांच्या कृतीने त्यांचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.
जॅकी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते आता ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसून येत आहेत. यामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसेच आता ते ‘बाप’, ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहेत. ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.