बॉलिवूड अभिनेता जायद खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सकरल्या आहेत. व्यावसायिक आयुष्यापेक्षा तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहीला आहे. तो आतापर्यंत दोन वेळा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नावेळचा एक प्रसंग शेअर केला आहे. त्याने पत्नी मलायका पारेखबरोबर लग्न करतानाचा एक किस्सा ऐकवला आहे. त्याचे खूप थाटामाटात लग्न केले. मात्र त्याने याआधी अगदी गपचूपपणे लग्न केले होते. तसेच या लग्नाबद्दल कोणालाही काहीही कल्पना दिली नव्हती. या लग्नाबद्दल त्याला बाहेर कळू द्यायचे नव्हते. यामध्ये केवळ च्या जवळचे लोक सहभागी झाले होते. (zayed khan life)
जायद अमृता राव व आरजे अनमोलच्या पॉडकास्ट ‘कपल ऑफ थिंग्ज’ मध्ये दिसून आला होता. यावेळी त्याने त्याच्या लग्नाबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तो म्हणाला की, “मी याआधी याबद्दल काहीही बोललो नाही. आमच्या लग्नाच्या गेस्टलिस्टमध्ये २००० लोकांची नावं समाविष्ट होती. हे लग्न आहे की सर्कस असं त्यावेळी वाटलं होतं. त्यामुळे आम्ही केवळ ३० मित्रांना फोन केलं आणि गोव्यामध्ये ताज विलाला जात असल्याचे सांगितले. तिथे गेल्यानंतर सगळ्यांसाठी एक सरप्राइज आहे असंदेखील आम्ही त्यांना सांगितले”.
पुढे त्याने सांगितले की, “खूप छान पद्धतिने मलायकाने फेरे आणि पंडितची सोय केली होती. गोवामध्ये ताजमध्ये आम्ही केले होते. आम्ही सात फेरे घेतले आणि ते आमचं सुंदर लग्न झाला. आम्हाला आमचे लग्न लक्षात राहील असं करायचं होतं. धमाल मस्ती करायची होती. ऑफिशियल लग्न करण्याआधीच आम्ही विवाहित होतो”.
आणखी वाचा – Video : आदित्य-पारूचा मराठमोळा थाट, दोघांसाठी तयार करण्यात आलं खास गाणं, प्रेम फुलणार
तसेच तो म्हणाला की, “माझ्या कुटुंबात सगळे सण साजरे केले जातात. मला हिंदु पद्धतींविषयी माहिती नव्हती. त्यामुळे लग्न करताना नक्की कसे काय करायचे याबद्दल मी मलायकाला विचारायचो. ती सांगेल तसं मी करायचो. आमचं सगळं कुटुंब देवाला खूप मानते”. जायदचा ‘मै हू ना’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता.