बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

The Family Man 3 च्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर, ‘या’ दिवशी येणार मनोज वाजपेयीची गाजलेली सीरिज, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amazon Prime Video and actor Manoj Vajpayee fame The Family Man 3 series release update

मनोज वाजपेयी फेम ‘द फॅमिली मॅन ३’ सीरिजच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर

The Family Man 3 : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक या सीरिजच्या आगामी सीझन्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन सीझन्सनत्र आता या सीरिजच्या तिसऱ्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या दोन सीजनच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या सीझनबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. या सीजनमध्ये अनेक नवीन कलाकारांचे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागून आहे. (The Family Man 3 Series Update)

सीरीज ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला. अशातच आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचीही चाहत्यांना आतुरता लागून राहिली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनच्या अखेरीस तिसऱ्या सीझनबाबत हिंट देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

आणखी वाचा – अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?

फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच राज आणि डीके यांनी ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ च्या रिलीजबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा दिग्दर्शक जोडीला फॅमिली मॅनच्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “अजूनही सीरजचे शूटिंग सुरु आहे. सीरिज शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. अजून काही शूटिंग बाकी आहे. प्रदर्शनाबात मला सांगण्याची परवानगी नाही. कारण ते कधी रिलीज होईल हा अ‍ॅमेझॉनचा निर्णय आहे. परंतु माझ्या मते पुढच्या वर्षी ही सीरिज प्रदर्शित होऊ शकते”.

आणखी वाचा – Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर

दरम्यान, ‘द फॅमिली मॅन ३’चे दिग्दर्शन आणि निर्मिती राज आणि डीके या जोडीने केली आहे. तर या सीझनची कथा राज, डीके व सुमन कुमार यांनी लिहिली आहे. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ च्या कलाकारांमध्ये प्रियमणी, शारीब हाश्मी आणि श्रेया धन्वंतरी यांचा समावेश असेल. काही वृत्तांनुसार, अभिनेत्री निम्रत कौरदेखील या सीरिजमध्ये एक दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.

Tags: ott entertainment newsThe Family Man 3 SeriesThe Family Man 3 Series Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Himani Shivpuri  Shared Incident

DDLJ च्या शूटदरम्यान पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एकटीनेच करावे लागले अत्यंसंस्कार, अशी वेळ नेमकी का आली?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.