गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा दिवसांनी घरी परतणार सैफ अली खान, रुग्णालयातून घरी जायला निघाला अभिनेता, आता परिस्थिती कशी?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 21, 2025 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saif Ali Khan Attacked

सहा दिवसांनी घरी परतणार सैफ अली खान, रुग्णालयातून घरी जायला निघाला अभिनेता, आता परिस्थिती कशी?

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर १५ जानेवारी रोजी एका अज्ञाताने घरात घुसून चाकूने हल्ला केला होता. आरोपींनी अभिनेत्यावर सहा वेळा हल्ला केला. तेव्हापासून सैफ मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या मणक्यात अडकलेला अडीच इंच चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने काढला. अभिनेत्याच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान सतगुरू शरण जाण्याऐवजी फॉर्च्युन हाईट्सला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सैफचे अपार्टमेंट सतगुरु शरण बिल्डिंगमध्ये आहे, येथेच अभिनेत्यावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर सैफ अली खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. सध्या वायरिंगचे काम सुरुआहे. डक्ट बंद करण्याचेही काम सुरु आहे. सैफ अली खानचे ऑपरेशन आणि उपचार करणाऱ्या चार डॉक्टरांच्या टीमने सैफ चालण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. तो बोलण्यास सक्षम आहे परंतु त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिना लागेल, असंही सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ज्या भागात आरोपीने वार केले होते आणि चाकूचा अर्धा भाग तुटला होता त्या भागात कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे जी बरी होण्यासाठी एक महिना लागेल.

आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुन कायमचे वेगळे?, सुभेदार कुटुंबाकडून अर्जुन-प्रियाच्या लग्नाचा घाट, नवा ट्विस्ट

तोपर्यंत डॉक्टरांनी सैफला वजन उचलण्यास, जिम व शूटिंग करण्यास मनाई केली असून त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, त्यांनी वेळोवेळी जनरल सर्जरी फिजिशियनचा सल्ला घ्यावा, असंही सुचवले आहे. दरम्यान, ६० तासांच्या मेहनतीनंतर मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा ३० वर्षांचा असून तो बांगलादेशचा रहिवासी आहे. सध्या आरोपी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत असून, यादरम्यान त्याची चौकशी करण्यात येत आहे.

आणखी वाचा – तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी-कुंकू, काळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, फोटो समोर

आरोपीने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले असून सैफच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी त्याने इतर अनेक कलाकारांच्या घरांची रेकी केल्याचे सांगितले आहे. सैफच्या इमारतीत प्रवेश करणे सोपे होते म्हणून तो अभिनेत्याच्या घरात घुसला. पोलिसांनी आरोपींसह सैफच्या घरी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले. यावेळी संपूर्ण बिल्डिंगमध्ये सैफ अली खानच्या घराचा फक्त मागचा दरवाजा उघडा होता आणि सीसीटीव्हीही बंद असल्याचे समोर आले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Tags: saif ali khan attackedSaif Ali Khan breaking Newssaif ali khan discharge
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Actress Rashmika Mandana look shared as Maharani Yesubai from Vicky Kaushal's Chhaava movie

पारंपरिक लूक, मराठमोळा पेहराव अन्…; येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदानाचा पहिला लूक समोर, तुम्हाला आवडला का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.