शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन वेळा घटस्फोट, एकट्यानेच मुलाचा सांभाळ अन्…; आता कसं आयुष्य जगते ‘सुर्यवंशम’मधील गौरी, स्ववतःचं नावंही बदलेलं कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 9, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
gauri in suryavamsam

'सूर्यवंशम'मधील गौरी सध्या करते तरी काय?

बॉलिवूडमधील ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट जुना झाला तरीही आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. १९९९ साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इव्हीव्ही सत्यनारायण यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही हा चित्रपट टेलिव्हिजनवर दाखवला जातो. या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील सर्वच भूमिका व कलाकार आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहेत. यामध्ये अमिताभ म्हणजे हिरा यांच्या पत्नीची भूमिका सौंदर्या या दाक्षिणात्य अभिनेत्रीने साकारली होती. तसेच यामध्ये अनुपम खेर, कादर खान, शिवाजी साटम यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. मात्र यामध्ये एक भूमिका अधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे गौरीची. (gauri in suryavamsam)

‘सूर्यवंशम’ चित्रपटामध्ये हिरा ठाकूरच्या प्रेयसीची म्हणजे गौरीची भूमिका सकारणारी अभिनेत्री म्हणजे रचना बॅनर्जी. २ ऑक्टोबर १९७२ रोजी  रचना यांचा जन्म झाला. त्यांचे नाव आधी झुमझुम बॅनर्जी होते. मात्र मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे नाव बदलून रचना बॅनर्जी ठेवले. त्यांनी अनेक बंगाली, ओडिसी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच काही तमिळ, तेलगू व कन्नड चित्रपटांमध्येदेखील दिसून आल्या. त्यांनी प्रसेनजीत चटर्जी व चिरंजीवी यांच्याबरोबरदेखील भूमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा – “घरी दुर्देवी घटना घडली पण…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर व्यक्त झाल्या मृणाल कुलकर्णी, म्हणाल्या, “थांबायचं नाही कारण…”

View this post on Instagram

A post shared by Rachna Banerjee (@rachnabanerjee)

सध्या त्या अभिनयामधून बाहेर आलेल्या दिसत आहेत. त्या आता एक उद्योजिका असून त्यांचा साडी व कॉस्मेटिक ब्रॅंडदेखील आहे. त्याचप्रमाणे त्यान २०२४ साली लोकसभा निवडणुकीसाठीदेखील उभ्या होत्या. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या TMC पार्टीकडून उमेदवार म्हणून उभ्या होत्या. हुगळी येथून त्यांनी BJP च्या लॉकेट चटर्जी यांचा पराभव केला होता.

आणखी वाचा – Video : पायऱ्या उतरताना विजय देवरकोंडाचा गेला तोल, थेट घसरतच खाली आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

आजवर रचना यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना अभिनयक्षेत्रात जास्त यश मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांनी  मनोरंजन क्षेत्राला राम-राम केला. दरम्यान त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या सह-कलाकार सिद्धांत मोहपात्रा यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्या. मात्र २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर २००७ साली त्यांनी प्रबल बासु यांच्याबरोबर लग्न केले पण २०१६ साली ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगादेखील आहे. सोशल मीडियावरदेखील रचना अधिक सक्रिय असतात. त्यांचे ८७३k फॉलोअर्स आहेत.

Tags: gaurirachna banrjeesuryavamsam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Navri Mile Hitlerla Marathi serial updates Leela gives AJ a smiley ball as a gift on Diwali Padwa

Navri Mile Hitlerla : पहिल्या पाडव्याला लीलाने ऐजेसाठी आणलं खास गिफ्ट, खास भेटवस्तूचा अर्थही समजावून सांगितला, प्रेमाला नवी दिशा मिळणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.