बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राम गोपाल वर्मा अडचणीत आले असून या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जात आहे. चेक बाऊन्स प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या ‘सिंडिकेट’ या नव्या प्रकल्पाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला. मंगळवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. मात्र, राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. (ram gopal varma convicted in cheque bounce case)
यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिग्दर्शकाविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट (NBW) जारी करण्याचे आदे,ram gopal Varma cheque bounce casesमाखाली दंडनीय गुन्हा आहे. याप्रकरणी राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला ३.७२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा त्यांना तीन महिन्यांची साधी शिक्षा भोगावी लागेल.
“ONLY MAN CAN BE THE MOST TERRIFYING ANIMAL “
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 22, 2025
In CONTINUATION to my CONFESSION note on SATYA film , I DECIDED to make the BIGGEST film ever
The film is called SYNDICATE
It’s about a terrifying organisation which threatens the very EXISTENCE of INDIA
The CONCEPT
STREET…
२०१८ मध्ये श्री नावाच्या एका कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत चेक बाऊन्सचा खटला दाखल केला होता. हा खटला वर्मा यांच्या फर्मविरोधात होता. वॉरंट जारी झालेल्या या प्रकरणात जून २०२२ मध्ये वर्मा यांना न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. ज्या गुन्ह्यात राम गोपाल यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३१ अंतर्गत येतो, ज्या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर क्रिकेटचा खेळ, लीलाच्या सासूची दमदार बॅटिंग, व्हिडीओ समोर
दरम्यान, या वादात राम गोपाल वर्मा यांचे नाव त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेबाबतही चर्चेत राहिले. राम गोपाल यांच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘सिंडिकेट आहे’, ज्याची घोषणा राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरुन केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी २०२२ मध्ये एकदा चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मिळाल्याचे सांगितले आहे.