‘झी मराठी’ वाहिनीवरील सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. राकेशने साकारलेला एजे (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. तसंच मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या चांगलंच खिळवून ठेवलं आहे. मालिकेत सध्या दोघांच्या हटके लव्हस्टोरीचे कथानक पाहायला मिळत आहे. दोघांमधील प्रेम फुलत असून त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे कलाकारांची व मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. (vallari viraj shared cricket video)
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकार हे कायमच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सेटवरील मजामस्ती आणि मजेशीर व्हिडीओ ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. पडद्यावर घडणाऱ्या घडामोडी पडद्यामागे साकारताना काय मेहनत घ्यावी लागते याची झलक ते आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांचे हे पडद्यामागील काही खास क्षण चाहत्यांनाही पाहायला आवडतात. अशातच वल्लरी विराजने सेटवरील क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे; जो सध्या खूप चर्चेत आहे. वल्लरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेच्या सेटवर कलाकार व काही तंत्रज्ञ मंडळी शूटिंगमधून वेळ काढत क्रिकेट खेळत आहेत.
या व्हिडीओमध्ये आजी (अभिनेत्री भारती पाटील) फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू टाकल्यानंतर त्या लीला म्हणजेच वल्लरीकडे बॅट वळवतात आणि तो चेंडू वल्लरीकडे येतो. या व्हिडीओमध्ये लीला खूपच आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह तिने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. “जेव्हा मी म्हणते की, आमच्या सेटवर एकही कंटाळवाणा क्षण कधीच येत नाही, तेव्हा मला हे म्हणायचे असते” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जहागीरदारांच्या घरी धमाल रंगली होती. विशेष म्हणजे एजेने लीलाच्या घरी जाऊन तिच्यासाठी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने केल्याचं पाहायला मिळालं. एजेचं प्रेम तिला कळतं असतं. पण, एजे स्वतःहून लीलावरचं प्रेम कबुल करत नाही. त्यामुळे एजे कधी लीलासमोर प्रेम व्यक्त करतो? या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.