बॉलीवूड अभिनेता आमिर खान अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची दुसरी पत्नी किरण राव बरोबर घटस्फोट घेतल्याने चर्चेत आला होता. दोघांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला असून आता दोघांचेही रस्ते आता वेगळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसून आले होते. त्यावेळी त्याची पत्नी किरणने वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिने आपल्या गर्भपाताबद्दलही भाष्य केले असून तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले तेदेखील सांगितले आहे. (kiran rao on miscarriage)
आमिर व किरण यांनी २००५ साली लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांना सरोगसीच्या माध्यमातून आझाद नावाचा मुलगा झाला. परंतु त्याआधी किरण एका मुलाला जन्म देणार होती पण गर्भपात झाल्यामुळे तिने बाळाला गमावले होते. त्याबद्दल तिने माध्यमांशी बोलताना सांगितले. किरणने नुकतीच तिने ‘झुम’ला मुलाखत दिली होती. ती मुलाखत देताना म्हणाली की, “ज्या वर्षी ‘धोबी घाट’ चित्रपट बनवला गेला त्यावर्षीच आझादचा जन्म झाला. त्याच्या जन्माआधी मला खूप शारीरक समस्यांना सामोरे जावे लागत होते”.
पुढे ती म्हणाली की, “आम्ही मुलासाठी प्रयत्न करत होतो. पण माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मी बाळाला जन्म देण्यास समर्थ नव्हते. मी खचले होते. तसेच त्यावेळी खूप नैराश्य आले होते. पण जेव्हा आझादचा जन्म झाला तेव्हा मात्र मी खूप खुश होते. त्याचे पालन पोषण करण्यासाठी मी माझा पूर्ण वेळ दिला”.आझादच्या जन्मानंतर किरण चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याच्याकडे लक्ष देऊ लागली तसेच त्यांच्या पालन-पोषणाकडे लक्ष देऊ लागली. मात्र आता १० वर्षांनी ती पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीकडे वळली. नुकताच तिने दिग्दर्शन केलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.
यावेळी आझाददेखील अभिनय करणार का? असे विचारल्यानंतर ती म्हणाली की, “नाही. आता तरी नाही. सध्या तरी तो चित्रपटसृष्टीमध्ये काही करण्याचा विचार नाही. त्याला चित्रपटांची आवड नाही. त्याला कला, संगीत व ॲनिमेशनमध्ये रस आहे”. सध्या किरणचा ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवली होती. आता पुढे किरण कोणत्या चित्रपटाची धुरा सांभाळेल याची उत्सुकता आहे.