बॉलिवूड स्टारकीडमध्ये सध्या रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची लेक राहा कपूरचे नाव आघाडीवर आहे. २०२२ साली राहाचा जन्म झाला. जन्मानंतर एक वर्षापर्यंत या जोडीने राहाचा चेहरा माध्यमांसमोर आणला नाही. मात्र २०२३ साली ख्रिसमसच्याच्या दिवशी तिला माध्यमांसमोर आणले गेले आणि तिचे गोंडस फोटो सर्वत्र व्हायरल झाले. तिच्या सर्व फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली. इंटरनेटवर तिचे फोटो ट्रेंडिंगला असलेले दिसत होते. त्यानंतर राहा सर्वत्र दिसू लागली. एअरपोर्ट, कार्यक्रम अशा ठिकाणी ती आई-वडिलांसहित दिसू लागली. काही दिवसांपूर्वी तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती आजी नितू कपूर यांच्याशी खेळत असलेली तसेच काहीतरी बोलत असलेली पहायाल मिळाली. (ranbir kapoor and alia bhatt daughter video)
आशातच आता आलिया पॅरिस फॅशन वीक २०२४ मध्ये सामील होण्यासाठी गेली होती. तिथून परतत असताना मुंबई एअरपोर्टवर तिला स्पॉट केले गेले. तिच्याबरोबर रणबीर, नितू व राहादेखील दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र यावेळी असं काही झालं ज्यामुळे या व्हिडीओकडे सगळ्यांचेक लक्ष वेधले गेले आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर व आलियाने डोळ्यांवर काळ्या रंगाचा चश्मा लावलेला होता. यामुळे कॅमेरा फ्लॅशपासून त्यांना अधिक त्रास झाला नाही. मात्र राहाला चश्मा नसल्याने तिला त्रास सहन करवा लागला. या व्हिडीओमध्ये राहाला झोप आल्याचेदेखील दिसून आले. पण नंतर मात्र कॅमेरा फ्लॅशमुळे तिला त्रास झाल्याचे बोलले गेले.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी कॅमेराचा फ्लॅश बंद करण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हा वेडेपणा आहे. मुलांच्या डोळ्यांच्या समोर फ्लॅश मारु नका. ते त्यांच्या डोळ्यांसाठी खूप घातक आहे”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “कॅमेराची फ्लॅश लाइट मुलांच्या डोळ्यांवर मारु नये”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “ती घाबरली आहे वाटत” दरम्यान या व्हिडीओकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.