आपल्या हास्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अर्चना पूरण सिंह हिने यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर बऱ्याच काळापासून ती कपिल शर्माच्या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली आहे. आजवर तिने सिनेसृष्टीत तिच्या उत्तम अभिनयशैलीने स्वतःचे स्थान स्वतः निर्माण केले आहे. कायमच ती तिच्या हास्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसते. हिंदी चित्रपटसृष्टीत अर्चनाने आजवर उत्तम कामगिरी केली आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून पाहता यशस्वी ठरलेल्या अर्चना यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. (Archana Puran Singh Personal Life)
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९६२ रोजी उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे झाला. अर्चना पूरण सिंहने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अनेक वर्षांपासून ती कपिल शर्माच्या शोचे ग्लॅमर वाढवणारी जज म्हणून दिसली आणि या शोमुळे तिला विशेष लोकप्रियताही मिळाली. आपल्या जोरजोरात हसण्याने सगळ्यांना हसवणाऱ्या अर्चनाला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक दु:खाचा सामना करावा लागला आहे. फार कमी लोकांना माहित असेल की तिने दोनदा लग्न केले आहे.
१९८७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्चनाने पहिल्यांदा कोणाशी आणि कधी लग्न केले याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, काही दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अर्चनाला पुन्हा लग्न करायचे नव्हते. पण जेव्हा अभिनेता परमीत सेठी अभिनेत्रीच्या आयुष्यात आला तेव्हा सगळंच चित्र बदललं. अर्चना -परमीतने घरातून पळून जाऊन लग्न केले.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : …अन् निक्की रडली! टास्कदरम्यान घडली मोठी चूक, कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?
परमीतच्या कुटुंबीयांना कोणतीही अभिनेत्री त्यांची सून बनू इच्छित नव्हती. यामुळे दोघेही पळून गेले आणि १९९२ मध्ये त्यांनी लग्न केले. उल्लेखनीय आहे की अर्चना पती परमीतपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. अर्चना आणि परमीतने आपल्या लग्नाची गोष्ट चार वर्षे लपवून ठेवली होती. लग्नानंतर दोघेही आर्यमन सेठी आणि आयुष्मान सेठी या दोन मुलांचे पालक झाले.