Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ‘बिग बॉस’ने केलेल्या घोषणेने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अखेर ‘बिग बॉस’ने यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा केली. सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावत ‘बिग बॉस’ने सदस्यांना खूप मोठा धक्का दिला. यंदाचा सीझन हा १०० दिवसाचा नसून केवळ ७० दिवसांचा असणार असल्याचं सांगत साऱ्यांना धक्का दिला. पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे.
सध्या घरात कॅप्टन नाही आहे त्यामुळे कॅप्टन होण्यासाठी मंगळवारच्या भागात ‘बिग बॉस’कडून एक नवीन टास्क देण्यात आला आणि यांचे नाव होते सांगकाम्या आणि मालक. गकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे. यांत एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी हे सांगकामे होतात तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की मालक होतात.
त्यामुळे मालक असलेली टीम सांगकाम्यांकडून काम करुन घेताना दिसत आहे. निक्की, वर्षा यांनी तर काल सांगकाम्यांकडून वैयक्तिक काम करुन घेतली. तर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की पॅडी दादांकडे चहा बनवून मागताना दिसत आहे. सर्व सामग्री वापरुन चहा बनवला की नाही हे देखील ती तपासताना दिसली. पॅडी दादा कामात व्यस्त असल्याने ते निक्कीला चहा ओतून घ्यायला सांगतात मात्र ती नकार देत तुम्ही तुमचं काम झाल्यावर द्या असं सांगते. आणि बाहेर जात दुसऱ्या कोणाला तरी सांगते असं म्हणते.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्यास तयार नव्हती अर्चना पूरण सिंह, पाच वर्ष लहान मुलाशी विवाह केला अन्…
तर इकडे सूरज अंकिता व जान्हवीला काम सांगताना दिसत आहे. सूरजने अंकिता व जान्हवीला काम सांगत नाचायला सांगितलं. मालकांची ऑर्डर फॉलो करत अंकिता व जान्हवीने चंद्रा या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. अंकिताला नाचता येत नाही तरी ती मालकांची इच्छा पूर्ण करताना दिसली. तर त्यानंतर सूरज दोघींकडे उगवली शुक्राची चांदणी या गाण्यावर ठेका धरायची फर्माईश करतो. त्यावर दोघीही डोळे मोठे करुन त्याकडे पाहत राहतात. एकूणच सूरज, अंकिता, जान्हवी सगळेच या टास्क दरम्यान धमाल करताना दिसले.