शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी मुलगी तीन मुलांबरोबर…”, लेकीच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर भडकली श्वेता तिवारी, म्हणाली, “मीच दर वर्षी लग्न करुन…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 30, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shweta tiwari on daughetr relationship

मुलीच्या चर्चावरुन भडकली श्वेता तिवारी

टेलिव्हिजनवरुन नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. तिच्याबरोबरच मुलगी पलक तिवारीदेखील अधिक चर्चेत राहिलेली बघायला मिळते.  श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या जरी श्वेता अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असते. श्वेताप्रमाणे तिची लेकदेखील आता चांगलीच येताना दिसून येत आहे. पलकचे नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमबरोबर जोडले जात आहे. अनेकवेळा त्यांनी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचेदेखील सांगितले आहे. अशातच आता या सगळ्यामुळे कोणताही फरक पडत नसल्याचे स्वतः श्वेताने सांगितले आहे. (shweta tiwari on daughetr relationship)

श्वेताने सांगितले की, “या सगळ्या अफवांमुळे मला आता त्रास होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून समजलं आहे की लोकांची स्मरणशक्ती चार तासांची आहे. त्यानंतर ते सगळं विसरून जातात. त्यामुळे कशाला चिंता करा? अफवांच्या मते माझी मुलगी तीन मुलांना डेट करत आहे आणि मी प्रत्येक वर्षी लग्न करते. इंटरनेटच्या मते मी आधीच तीन वेळा लग्न केले आहे”.

आणखी वाचा – Video : अखेर संतोष जुवेकरने कुशल बद्रिकेकडून घेतलं महागडं गिफ्ट, हायवेलाच भेटून सरप्राइज अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

पुढे ती म्हणाली की, “या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. जेव्हा सोशल मीडिया नव्हतं आणि पत्रकार तुमच्याबाबत चांगलं लिहिणं पसंत करत नव्हते तेव्हा मला खूप वाटायचं. कलाकारांच्या बाबतीत नकरात्मकता विकली जाते. त्या सगळ्यातून बाहेर पडल्यानंतर मला आता काहीही वाटत नाही”.

आणखी वाचा – “नुसती चिखलफेक, दुर्देवाने…”, प्राजक्ता माळीला पंकजा मुंडेंचा मोठा पाठिंबा, म्हणाल्या, “प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना…”

दरम्यान सिद्धार्थ कननच्या एका मुलाखतीमध्ये पलकने इब्राहिमबद्दल असलेल्या नात्यावर भाष्य केले होते. ती म्हणाली की, “आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही बाहेर पडलो. एकत्रित स्पॉट झालो तर ते तिथेच संपलं पाहिजे. पण असं व्हायचं नाही. आम्ही ग्रुपमधून जायचो. इब्राहिम खूप गोड मुलगा आहे”. दरम्यान पलकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात दिसून आली होती.

Tags: palak tiwarirelationshipShweta Tiwari
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Amitabh Bachchan attended the wedding with Jaya and Abhishek but Aishwarya Rai not seen photo viral on social media

बच्चन कुटुंबामधून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा गायब, 'त्या' व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण, आता नेमकं काय बिनसलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.