बॉलिवूड सिनेविश्वात नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकार जोडप्यांपैकी एक लोकप्रिय जोडपं म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन. ही लोकप्रिय जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळते. ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक बातम्या सतत कानावर पडत होत्या. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या व अभिषेक ही जोडी घटस्फोट घेणार असल्याचंही समोर आलं. या चर्चांवर दोघांपैकी कोणीही काहीही भाष्य केलेलं नाही. पण त्यांच्याबद्दलच्या अनेक चर्चा आजही होताना दिसतात. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या आल्या होत्या पण आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात त्यांना एकत्र पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. (aishwarya rai not seen in Bachchan family photo)
अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिषेक आपल्या आई-वडिलांबरोबर लग्नात पोज देताना दिसत आहे. यामध्ये ऐश्वर्या राय दिसत नसल्याने लोक पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. अमिताभ बच्चन नुकतेच मुंबईत एका लग्नाला गेले होते. जिथे जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही त्यांच्यासोबत गेले होते. या लग्न समारंभाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बच्चन कुटुंब वधू-वरांबरोबर पोज देताना दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांचा मुलगा रिकिनच्या लग्नाला हजेरी लावली. जो बच्चन कुटुंबाशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडला गेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन देखील होते. या लग्नसोहळ्यामधील एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये बच्चन कुटुंब वधू-वरांबरोबर पोज देताना दिसत आहे. मात्र, या फोटोमधील एक गोष्ट अनेकांना खटकली आहे ती म्हणजे त्यांची सून ऐश्वर्या राय या फोटोमध्ये नाही.
या फोटोमध्ये अमिताभ बच्चन काळ्या इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहेत, तर अभिषेक बच्चन पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत. तर जया बच्चन यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय या लग्नात सहभागी झाली होती की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. पण या फोटोत तिच्या अनुपस्थितीनं पुन्हा एकदा अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सतत होत असतात. अशातच या फोटोमुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे.