टेलिव्हिजनवरुन नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. तिच्याबरोबरच मुलगी पलक तिवारीदेखील अधिक चर्चेत राहिलेली बघायला मिळते. श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या जरी श्वेता अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असते. श्वेताप्रमाणे तिची लेकदेखील आता चांगलीच येताना दिसून येत आहे. पलकचे नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमबरोबर जोडले जात आहे. अनेकवेळा त्यांनी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचेदेखील सांगितले आहे. अशातच आता या सगळ्यामुळे कोणताही फरक पडत नसल्याचे स्वतः श्वेताने सांगितले आहे. (shweta tiwari on daughetr relationship)
श्वेताने सांगितले की, “या सगळ्या अफवांमुळे मला आता त्रास होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून समजलं आहे की लोकांची स्मरणशक्ती चार तासांची आहे. त्यानंतर ते सगळं विसरून जातात. त्यामुळे कशाला चिंता करा? अफवांच्या मते माझी मुलगी तीन मुलांना डेट करत आहे आणि मी प्रत्येक वर्षी लग्न करते. इंटरनेटच्या मते मी आधीच तीन वेळा लग्न केले आहे”.
पुढे ती म्हणाली की, “या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. जेव्हा सोशल मीडिया नव्हतं आणि पत्रकार तुमच्याबाबत चांगलं लिहिणं पसंत करत नव्हते तेव्हा मला खूप वाटायचं. कलाकारांच्या बाबतीत नकरात्मकता विकली जाते. त्या सगळ्यातून बाहेर पडल्यानंतर मला आता काहीही वाटत नाही”.
दरम्यान सिद्धार्थ कननच्या एका मुलाखतीमध्ये पलकने इब्राहिमबद्दल असलेल्या नात्यावर भाष्य केले होते. ती म्हणाली की, “आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही बाहेर पडलो. एकत्रित स्पॉट झालो तर ते तिथेच संपलं पाहिजे. पण असं व्हायचं नाही. आम्ही ग्रुपमधून जायचो. इब्राहिम खूप गोड मुलगा आहे”. दरम्यान पलकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात दिसून आली होती.