शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, अभिनेत्रीने केले उपचार, पोस्ट करत म्हणाली, “अशी वेळ कोणावरही…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaya bhattacharya rescue puppy

दीड महिन्याच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार

टेलिव्हिजनवरील ‘क्योकी सास भी कभी बहू थी’, ‘थपकी प्यार की’ या मालिकांमधून पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जया भट्टाचार्य. अभिनयाबरोबरच त्या पशू संवर्धनाचेदेखील काम करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी एका श्वाना वाचवल्याचे दिसून येत आहे. एका तरुणाने या श्वानाच्या छोट्या पिल्लाचे लैंगिक शोषण केले होते. त्या पिल्लाच्या उपचारासाठी घेऊन जाताना त्या दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्या छोट्या पिल्लाला बास्केटमध्ये ठेवलेले दिसून येत आहे. तसेच डायपरदेखील घातले आहे आणि पायाला पट्टी बांधलेलीदेखील दिसून येत आहे. अभिनेत्री या पिल्लावर उपचार झाल्याचे सांगितले मात्र त्याला खूप वेदना होत असल्याचे सांगितले आहे. (Jaya bhattacharya rescue puppy)

जया यांनी सोशल मीडियावरदेखील पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “राक्षसी वृत्तीच्या तरुणाकडून त्या पिल्लावर अत्याचार झाले आहेत. हे कोणत्याही व्यक्तीच्या विचारांच्या पलीकडील आहे. त्या व्यक्तीला कधीही अशा वेदनेचा सामना करावा लागला नाही हे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. या पिल्लाबरोबर असं व्हायला नको हवं होतं. पण त्या अपराधी व्यक्तीला सोडूनदेखील देण्यात आलं आहे ही निराशेची बाब आहे”.

आणखी वाचा – “डोक्यावरचं आभाळ फाटलं, पायाखालची जमीन निसटली अन्…”, वडिलांच्या आठवणीत ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले, “गेली १९ वर्ष सतत…”

View this post on Instagram

A post shared by Thank you Earth (@ngothankyouearth)

दरम्यान जया यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मुक्या जनावरांची सेवा करत खूप चांगले काम करत असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे. जया यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर “तो अपराधी कुठे आहे?”, असे विचारले आहे. तसेच एकाने लिहिले की, “त्या व्यक्तीचे असे बाहेर फिरणे सुरक्षित नाही. आज पिल्लू होतं उद्या कदाचित एखादं माणसाचं बाळ असेल”, दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, “हे खूप भयंकर आहे”, तसेच अजून एकाने लिहिले की, “त्या छोट्या पिल्लासाठी खूप वाईट वाटत आहे”, अजून एकाने लिहिले की, “देव त्या पिल्लाला लवकर बरे करो”. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्यास का?”, ख्रिसमसच्या फोटोंवरुन मराठी अभिनेत्याला नेटकऱ्याने सुनावलं, भडकून म्हणाला, “ईदलाही माहीमला जातो आणि…”

जया यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी आजवर ‘सिर्फ तुम’, ‘फिजा’, ‘देवदास’, ‘लज्जा’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘मीमी’ आशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘रंगोली, ‘अंबर धारा’, ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या आहेत.  

Tags: jaya bhattacharyapuppyrescue puppy
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
kaumudi walokar wedding

'आई कुठे…' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.