टेलिव्हिजनवरील ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेमध्ये राम कपूर यांची मुख्य भूमिका असलेली बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपूर्वी राम यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली होती. राम यांचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वजन केल्याचे दिसून आले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. मात्र त्यांनी पत्नी गौतमी कपूरबरोबर एक फोटों शेअर केला होता. यामध्ये त्यांनी तब्बल ४२ किलो वजन कमी केलेले दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी राम यांचे कौतुकदेखील केले होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. (Ram kapoor on rakhi sawant)
राम यांनी नुकतीच सिद्धार्थ कननच्या मुलाखतीमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. नुकताच त्यांनी राखी सावंतबद्दल भाष्य केले आहे. जे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. ते म्हणाले की, “आज संपूर्ण देश राखी सावंतला ओळखतो. ती आता मुंबईच्या एका 3BHK फ्लॅटमध्ये राहते. ते तिने स्वतःने कमावलं आहे. मी तिचे तत्त्वज्ञान, वेडेपणा व ती जे काही बोलते त्याच्याशी मी कधीही सहमत करत नाही. पण ती जे काही करते, जी काही आहे ते आयुष्य तिने स्वतः निर्माण केले आहे. त्याचा तुम्ही सन्मान कसा करत नाही?”.
पुढे ते म्हणाले की, “एक चांगली डान्सर आहे पण मनोरंजन क्षेत्राला तिचा गैरवापर कारायचा होता. तिला खूप वाईट अनुभव आले आहेत. कोणीही गॉडफादर नाही. काही नाही. हे सगळं मी ‘राखी का स्वयंवर’च्या वेळी बघितलं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकू शकता”. दरम्यान राम यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे. तसेच याबद्दलची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. राखी ही नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.
राम यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांची ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका चांगलीच गाजली. मालिकांबरोबरच ते अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून आले होते. ‘लवयात्री’, ‘कैदी बॅंड’, ‘नियत’, ‘द बिग बुल’, ‘हमशकल्स’, ‘लक्ष्मी’, ‘स्टुडंट ऑफ द ईयर’, ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते.