बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची अवस्था सध्या नाजुक असून त्यांना रुग्णालायात भरती केल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे आता टिकू यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. टिकू यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकतेच ते राजकुमार रावबरोबर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसून आले होते. यामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली होती. मात्र त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (tikku talsania heart attack news )
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार टिकू यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या अवस्था नाजुक असल्याचेही म्हंटले जात आहे. सध्या टिकू ७० वर्षांचे असून १९८४ साली टेलिव्हिजन शो ‘ये जो है जिंदगी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दोन वर्षानंतर म्हणजे १९८६ साली त्यांनी ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’, ‘असली नकली’ या चित्रपटांमध्ये दिसून आलए. त्याच प्रमाणे ‘बोल राधा बोल’, कुली नंबर १’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हीरो नंबर १’, ‘बडे मिया छोटे मिया’ ‘विरासत’ व ‘हंगामा २’ या चित्रपटांमध्येही दिसून आले.
चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘जिंदगी अभि बाकी है मेरे दोस्त’ ‘सजन रे फिर झूट मत बोलो’ या मालिकांमध्ये दिसून आले होते. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचे लग्न दीप्ती यांच्याबरोबर झाले. त्यांची दोन मुलं असून एक मुलगा म्हणजे रोहन तलसानिया हा संगीतकार आहे.
तसेच त्यांची मुलगी शिखा तलसानिया ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘वेक अप सिड’ ‘वीरे दी वेडिंग’, ‘कुली नंबर १’ व ‘आय हेट लव्ह स्टोरीज या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. शिखाच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.