हिंदी तसेच साऊथ सुपरस्टार रजनीकांत सध्या खूप चर्चेत आहेत. सोमवारी त्यांना सोमवारी रात्री त्यांना चेन्नई येथील आपोलो रुग्णालयात भरती केले होते. मिळालेल्या माहितीनुसार रात्री त्यांच्या पोटात खूप दुखू लागले त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचेदेखील रुग्णालयातील काही सूत्रांनी सांगितले. रजनीकांत यांच्या तब्येतीविषयी माहीत समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच सगळ्यांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थनादेखील केल्या. अशातच आता त्यांच्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णाल्यातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. (rajinikanth dishcharge from hospital)
रजनीकांत यांना ३ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ११ वाजता चेन्नईतील अपोलो रुग्णाल्यातून सोडण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांना भरती केल्यानंतर त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिनीमध्ये सूज आली होती त्यावर उपचार केले गेले आणि ट्रान्सकॅथेडर मेथड वापरुन ऑर्थ्रोग्राफीमध्ये स्टेन्ट लावली आहे. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉक्टरांनी आता त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जेव्हा डॉक्टरांची परवानगी असेल तेव्हाच ते चित्रीकरण सुरु करु शकतील असेही म्हंटले जात आहे.
दरम्यान आता रजनीकांत यांना रुग्णाल्यातून घरी सोडल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच ते आता लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनादेखील ते करत असतात. जेव्हा रजनीकांत यांना रुग्णालयात भरती केले गेले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती देत ते बरे असल्याचे सांगितले होते. मात्र त्या याबद्दल अधिक माहिती देऊ शकल्या नाहीत. तसेच याआधी दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिंगापुर येथे त्याचे किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे तब्येतीमुळे त्यांनी राजकारणामधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
जनीकांतयांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा पहिला चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेट्टयां’ असे चित्रपटाचे नाव असून यामध्ये त्यांच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील शहनशाह अमिताभ बच्चनदेखील दिसणार आहेत.