बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी आता थोडा…”, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच दिवसांनी स्वतः श्रेयस तळपदेने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, “तुमच्या प्रार्थनांमुळे….”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2023 | 9:41 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood and marathi actor shreyas talpade gave health update by himself he said i am little better after heart attack

"मी आता थोडा…", हृदयविकाराच्या झटक्यानंतर ५ दिवसांनी स्वतः श्रेयस तळपदेने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, "तुमच्या प्रार्थनांमुळे….

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. श्रेयसला १४ डिसेंबर (गुरुवारी) रोजी शूटिंग वरुन घरी येताच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर, अभिनेत्याला मुंबईमधील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे म्हटले जात होते, परंतु अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. अशातच आता स्वतः अभिनेत्यानेच त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. (Shreyas Talpade Health Update)

श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते काळजीत पडले. त्याच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, आता खुद्द अभिनेत्याने त्याच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. अभिनेत्याने ‘झूम’ला दिलेल्या वृत्तानुसार असे म्हटले आहे की, “तुमच्या सर्वांच्या पाठिंबा व प्रार्थनांसाठी धन्यवाद. मी आता थोडा बरा आहे. काळजी नसावी”. यादरम्यान, अभिनेत्याने असेही सांगितले आहे की तो अद्याप घरी गेला नसून अजूनही रुग्णालयातच आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

आणखी वाचा – श्रेया बुगडेने भावाच्या लग्नाची केली होती जय्यत तयारी, पियुष रानडेने लाडक्या बहिणीचं केलं कौतुक, म्हणाले, “सगळं गुपित ठेवायचं होतं आणि…”

श्रेयसच्या तब्येतीबाबत त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट दिली होती. यात तिने श्रेयसच्या तब्येतीचे वृत्त कळताच अनेकांनी दाखवलेल्या काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी कुतज्ञता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी वेळेवर तातडीने केलेल्या मदतीसाठी व त्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल तिने धन्यवाद म्हटले होते. तसेच श्रेयसच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचेही तिने या पोस्टद्वारे सांगितले होते.

आणखी वाचा – “आधी लग्नाबाबत घरी सांगितलं अन्…”, सुरुची अडारकर व पियुष रानडेने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला, “पाच वर्षांपासून…”

दरम्यान, मराठीतील अनेक कलाकार मंडळींनीही त्याच्या तब्येतीवर चिंता व्यक्त केली होती. अभिनेत्री रेशम टिपणीसने “काळजी घे. श्रेयसला लवकरच बरं वाटेल. गणपती बाप्पा त्याची काळजी घेत आहे” असं म्हटलं होतं. तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही “श्री स्वामी समर्थ” असं म्हणत त्याच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. तसेच श्रेयसच्या अनेक चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्याला “लवकर बरा हो” असं म्हटलं आहे. त्यामुळे श्रेयसच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्याचे सगळेच चाहते व कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.

Tags: entertainment newsmarathi actorMarathi newsshreyas talpadeshreyas talpade healthshreyas talpade health updateshreyas talpade heart attackshreyas talpade news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tejaswini Pandit On Loksabha

"लोकशाही बसली धाब्यावर", संसदेतील खासदारांच्या निलंबनावर तेजस्विनी पंडितची पोस्ट, सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आता विरोध…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.