शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भावासाठी रितेश देशमुख प्रचाराच्या रिंगणात, झापूक झुपूक स्टाइलने केलं भाषण, उपस्थितांच्या टाळ्या, शिट्ट्या अन्…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood and Marathi actor Riteish Deshmukh give speech for brother Dheeraj assembly election campaign video viral on social media.

भाऊ धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख प्रचाराच्या रिंगणात, जोरदार भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख व धीरज देशमुख ही त्यांची मुलं त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. अशातच धीरज देशमुखही यंदा लातूरमधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रितेश देशमुख मैदानात उतरले आहेत. (, Riteish Deshmukh Dheeraj Deshmukh Campaign)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखदेखील भावांच्या प्रचारासाठी लातुरमध्ये पोहोचला होता. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी युवा मेळाव्यात रितेशनं जोरदार भाषण केलं. रितेशच्या भाषणाचं व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘झापुक झुपूक’ म्हणत रितेशनं धीरज देशमुख यांना मतदान करा असं जनतेला आवाहन केलं. “युवकांची साथ सोबत असल्याने आता महाविकास आघाडी सरकार येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhiraj Vilasrao Deshmukh (@dhirajvilasraodeshmukh)

आणखी वाचा – मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल

या व्हिडीओमध्ये रितेशने असं म्हटलं आहे की, “हा समोर जो जनसागर आहे ती खरी तर लीड आहे. ही जी सभा आहे. ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहे. धीरज भैय्या हा जो जनसागर आहे, ही खरं म्हणजे पावती आहे पावती… तुमच्या कामाची. ही पावती आहे तुम्ही जनतेची कामे केली आहेत, त्याची आहेत आणि तुम्ही ज्या लोकांसाठी संघर्ष करत आहात, त्यांच्या श्रद्धेची गर्दी आहे. ही पावती आहे तुमच्या निष्ठेची आणि लातूरच्या स्वाभिमानाची. हा स्वाभिमान तुम्ही राखत आहात हा स्वाभिमान केवळ स्वत:चा नाही, स्वर्गीय विलासराव देशमुखांचा नव्हे तर इथल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान राखण्याचा काम धीरज तुम्ही करत आहात आणि याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मैत्रिणींसह केली Bride To Be Party, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या…”

या प्रचाराआधी सोशल मीडियावर रितेशने धीरज देशमुख यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. “धीरज विलासराव देशमुख यांना माझं मत आहे”. असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.    दरम्यान, लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे. अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे लातूरमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi actorriteish deshmukhRiteish Deshmukh Dheeraj Deshmukh Campaign
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Mithun Chakraborty get threat

मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिम लोकांना कापून टाकण्याविषयी भाष्य केल्याचा आरोप, नक्की प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.