मराठीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. हेमल इंगळे ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हेमलने एका हिंदी टीव्ही शो आणि एका हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आपल्या निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याऱ्या हेमलने काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला होता आणि आता तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात हेमलचा साखरपुडा झाला होता. बॉयफ्रेंड रोनकबरोबर ती विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच हेमलने तिच्या Bride To Be Party चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Hemal Ingle Bride To Be Party)
हेमलने तिच्या मैत्रिणींबरोबर ही Bride To Be Party केली असून यावेळी हेमल तिच्या मैत्रीणींबरोबर केक कापताना पाहायला मिळत आहे. हेमल जेव्हा केक कापते तेव्हा तिच्या मैत्रिणी ब्रायडल शॉवर टू यू अस म्हणत जल्लोष करताना दिसत आहेत. हेमलच्या मैत्रिणी तिच्या नावासह फियोन्से फियोन्से अस म्हणतात. यानंतर ती मिस हेमल नाही तर मिसेस हेमल होणार अस म्हणतात. मैत्रिणींबरोबरच्या याच खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ हेमलणे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
हेमलने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनद्वारे असं म्हटलं आहे की, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी भरलेली ही खोली आहे हे सर्व हे सगळं जुळवून आणल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! प्रत्येक क्षण संस्मरणीय होता आणि मी ते आयुष्यभर जपत राहीन! पण आत्तासाठी, मला तुमच्या सर्वांसोबत हा केक कटिंग व्हिडिओ शेअर करायला आवडेल जे माझ्या मैत्रीचा अचूक सारांश देते. मी तुमच्यावर प्रेम करते”.
आणखी वाचा – मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल
‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अशातच नुकतीच हेमल ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत हेमलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर होता. हेमलच्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. साखरपुडा झाल्यानंतर अभिनेत्री आता विवाहबंधनात कधी अडकणार? याची चाहते मंडळी वाट पाहत आहेत.