सुपरमॉडेल उर्वशी रौतेला व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत हे नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. दोघांच्या नात्याबद्दल सोशल मिडियावर सतत चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या डेटिंग संदर्भात उर्वशीने दिलेले उत्तर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावरून नेटकऱ्यांनी अनेक तर्क-वितर्क मांडले होते. पण त्यांच्या नात्याबद्दल दोघांनी अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण अशातच आता पुन्हा एकदा उर्वशी ऋषभ पंतमुळे चर्चेत आली आहे. (Urvashi rautela instagram story)
सध्या उर्वशी एका नवीन मॅट्रोमोनियल जाहिरातीमुळे अडकली आहे. यामध्ये तिने ऋषभला काहीतरी बोलले असल्याचे आरोप नेटकरी करत आहेत. पण यावर उर्वशीने देखील आपल्या सोशल मीडियावरुन असं काहीही नसल्याचे स्पष्ट करत आपली बाजू मांडली आहे. हे नक्की काय प्रकरण आहे आणि उर्वशीने आपली बाजू मांडताना नक्की काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.
उर्वशी सध्या एका मॅट्रोमोनियलची जाहिरात करताना दिसून आली. या जाहिरातीमध्ये तिने म्हंटले आहे की अभिनेता,व्यावसायिक, गायक व क्रिकेटर्स यांच्याबद्दल भाष्य केले आहे. ती त्यामध्ये म्हणत आहे की, “मी अनेक लोकांना भेटले. ज्यामध्ये व्यावसायिक, अभिनेते व काही क्रिकेटर्स यांचाही समावेश आहे. पण यामध्ये माझ्या इतकी ऊंची असलेला कोणीही भेटला नाही”. त्यामुळे या जाहिरातीमध्ये तिने ऋषभचे नाव न घेता त्याच्या ऊंचीबद्दल मस्करी केल्याचा आरोप ऋषभच्या चाहत्यांनी केला आहे असून उर्वशीवर खूप टीका केली आहे.
याबद्दल चर्चा सुरु झाल्यानंतर एक लांबलचक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ही ब्रॅंडची एक स्क्रिप्ट आहे. यातून कोणाला काहीही बोलले गेले नाही. त्यामुळे सकारात्मक बोला. ब्रॅंडचा चेहरा असल्याने लोकांवर काय परिणाम होऊ शकतो हे मी समजू शकते”.
दरम्यान अनेकदा ऋषभ व उर्वशी यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु असतात मात्र दोघांनीही हे नातं स्वीकारले नाही. काही महिन्यांपूर्वी ऋषभचा गंभीर अपघात झाला होता त्यावेळीही उर्वशी त्याला बघण्यासाठी लगेचच रुग्णालयात पोहोचली होती. त्यावर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या.