रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यानंतर उर्मिता मातोंडकरने बदलेला हिंदू धर्म?, म्हणालेली, “हिंदू धर्म विकला जात आहे त्यावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 25, 2024 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
urmila matondkar on religion change

धर्मांतरावर उर्मिला मातोंडकरने केलं भाष्य

 ‘रंगिला’ हा चित्रपट माहीत नसणारे प्रेक्षक हे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील. यामध्ये उर्मिला मातोंडकरने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाने तिला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयातील प्रवास तिचा अजूनही सुरुचं आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत राहिली. आठ वर्षांपूर्वी ती काश्मिरी मुसलमान असलेल्या तरुणाबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र आता ते दोघंही विभक्त होण्याचे वृत्त समोर येत आहे. (urmila matondkar on religion change)

उर्मिलाने ३ मार्च २०१६ रोजी मोहसिन अख्तरबरोबर लग्न केले. लग्नानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले. तसेच लग्नानंतर तिने धर्मदेखील बदलला असून नाव मरियम अख्तर मीर असे ठेवले असल्याचे समोर आले होते. मात्र उर्मिलाने हे सर्व नाकारलं होतं. ‘बॉम्बे टाइम्स’बरोबर संवाद साधताना तिने याबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, “अशा प्रकारच्या राजकारणाला मी पाठिंबा देत नाही. मुळातच हे महत्त्वाचं नाही. मी माझ्या हिशोबाने आयुष्य जागते. मी आता जी आहे त्यावर मला गर्व आहे. मी कधीच चुका करत नाही असं म्हणायचं नाही. पण मला लाज वाटेल असं कोणतही काम मी आजवर केलं नाही”.

आणखी वाचा – “तिच्याबद्दल वाईट ऐकू शकत नाही”, लग्न तुटल्यानंतरही शिल्पा शिंदेबाबत एक्स बॉयफ्रेंडचं आहे ‘हे’ मत, म्हणाला, “तिचा निर्णय…”

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

पुढे ती म्हणाली की, “मी ज्या क्षेत्रात होते तिथे नकारात्मकता, गॉसिप अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. माझा धर्म बदलण्याच्या जेव्हा बातम्या समोर आल्या तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी हिंदू आहे. हिंदू धर्माचे पालन करते. आजकाल जो हिंदू धर्म विकला जात आहे त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर अभिमानाने सांगितलं असतं. पण कोणा इतरांना याबद्दल काहिही देणं-घेणं नसावं”.

आणखी वाचा – बायकोची गाढ झोप, रात्री दरवाजाच उघडला नाही अन्…; स्वतःच्याच घरात चोरासारखा आला कुशल बद्रिके, म्हणाला, “कुंभकर्णासारखी…”

दरम्यान आता उर्मिलाचे वैवाहिक आयुष्य सध्या अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. दोघंही लवकरच घटस्फोट घेऊन वेगळे होतील अशा बातम्या समोर येत आहेट. मात्र दोघांनीही अद्याप याबद्दल अधिकृत भाष्य केलं नाही.  

Tags: muslimreligionurmila matondakar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sanjay Patil Baby Girl

इतकी सुंदर दिसते ‘सुख म्हणजे…’फेम अभिनेत्याची लेक, सहा महिने पूर्ण होताच दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.