बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो. यावर्षी तो मलायकाबरोबरच्या ब्रेकअपमुळे चांगलाच चर्चेत राहिला. याबद्दल त्याने ‘सिंघम आगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सिंगल असल्याची घोषणा केली. त्यानंतर मलायका व त्याच्या ब्रेकअपच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्याचे नाव सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कुशा कपिलाबरोबरदेखील नाव जोडलं. मात्र यावर अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीमात्र अर्जुन आता त्याच्या कोणत्याही रिलेशनशिपमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्टदेखील केली आहे. नक्की काय झालं आहे? हे आपण आता जाणून घेऊया. (arjun kapoor on online fraud)
अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “एक संशयित व्यक्ती लोकांना संपर्क करुन माझा मॅनेजर असल्याचे सांगत आहे. तसेच माझ्याशी बोलण्यासाठी सांगत आहे. कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवा की हा मेसेज खरा नाही. या सगळ्यांशी माझा काहीही संबंध नाही. कोणतीही लिंक आली तर क्लिक करु नका”.
पुढे त्याने लिहिले की, “कृपया या फसवणूक करणाऱ्याच्या जाळ्यात अडकू नका. सुरक्षित आणि सतर्क राहा. जर तुम्हाला आशा प्रकारचा मेसेज मिळाला तर त्या अकाऊंटच्या विरोधात रिपोर्ट करा. सावध राहा”. अर्जुनच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच ही पोस्टदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान सध्या अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्याची एक्स गर्लफ्रेंड मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. अर्जुन व मलायकाने २०१८ साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातंदेखील स्वीकारलं होतं. दोघं अनेकदा पार्टीमध्ये, डिनरला, आऊटिंगदरम्यान दिसून यायचे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे सगळं बंद केलं. तसेच त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम आगेन’ या चित्रपटामध्ये खलनायक म्हणून दिसून आला होता. त्याच्या अभिनयाला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.