Dhanashree Verma Statement : युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटाच्या वृत्तावर धनश्री वर्माने अखेर मौन सोडले असल्याचं समोर आलं आहे. आपल्यावरील आरोपांबाबत धनश्रीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तिने अफवा पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आणि मला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचे देखील म्हटले आहे. धनश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः क्रिकेटर युजवेंद्रच्या चाहत्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असल्याने या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. मात्र, दोघांनीही घटस्फोट किंवा वेगळे होण्याची घोषणा अद्याप केलेली नाही.
धनश्रीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हटलं आहे की, “गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण गेले. खरंच अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे निराधार लिखाण, वस्तुस्थिती तपासण्याशिवाय, आणि माझ्या चारित्र्याला कलंकित करणारे द्वेषपूर्ण चेहरे आणि ट्रोलिंग. माझे नाव आणि सचोटी निर्माण करण्यासाठी मी अनेक वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. माझे मौन हे दुर्बलतेचे नाही तर ताकदीचे लक्षण आहे”.

धनश्रीने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “नकारात्मकता सर्वत्र सहज पसरते, इतरांच्या यशासाठी धैर्य आणि करुणा आवश्यक आहे. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करणे आणि माझ्या मूल्यांवर खरे राहून पुढे जाणे निवडेन. कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज न पडता सत्य उभं राहतं. ओम नमः शिवाय।”.
धनश्री वर्मा तिचा पती युजवेंद्र चहल याला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. वास्तविक, या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले आहे, त्यानंतर या अफवांना वेग आला आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर लोक धनश्रीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत होते. तिचे नाव कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडले जात होते. अशा परिस्थितीत आता धनश्रीने घटस्फोटाच्या बातमीत तथ्य आहे की नाही याबाबत काहीही सांगितले नसले तरी सर्वांनाच उत्तर दिले आहे.