Tula Shikvin Changlach Dhada update : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट हे येतच असतात. नुकतंच भुवनेश्वरीला चारुहासने घराबाहेर काढलं होतं. अक्षरा आणि अधिपती हनीमूनवरून कोल्हापुरात परातले आहेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. अधिपती ते ऐकून अत्यंत चिडतो. चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला आणि अक्षराला त्यांच्या हनीमूनला पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. अधिपती आणि अक्षरा यांच्यातही मोठा वाद होतो. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. मात्र अधिपतीला भुवनेश्वरी कुठेही मिळत नाही. थायलंडवरुन परत आल्यानंतर अधिपती “आईसाहेब घरात दिसत का नाहीत?” हे विचारतो. यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं. त्यामुळे आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो. अधिपती चारुहासचा गळा पकडत “तुमची हिंमत कशी झाली?” असा थेट प्रश्न विचारतो. मात्र या दोघांमध्ये अक्षरा येते आणि अधिपतीला अडवते.
अशातच आता या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षरा एका बाईच्या मागे धावत आहे. अक्षराला ती बाई भुवनेश्वरी असल्याचे वाटत आहे, मात्र ती भुवनेश्वरी नसून चारुलता आहे. त्यामुळे आता माइकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मार्केटमध्ये अक्षराला चारुलता दिसते. त्यामुळे ती तिच्या मागे मागे जाते. दोघी समोरासमोर येताच अक्षरा “भुवनेश्वरी तुम्ही इतके दिवस कुठे होतात? चला आपण घरी जाऊ असं म्हणते. यावर ती बाई अक्षराला “तुमचा काहीतरी गैरमसज होत आहे, मीए भुवनेश्वरी नाही चारुलता आहे” असं म्हणते.
या नवीन प्रोमोमधून ती बाई चारुलताची जन्मदात्री असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? त्यामुळे आता या मालिकेत काय नवीन वळण येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? चारुहास या चारूलताला आपली आई म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे