‘बिग बॉस मराठी सीझन ५’ ची सर्वत्र हवा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सर्वच स्पर्धक एकापेक्षा एक असून त्यांची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वातून कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांची पहिल्या आठवड्यातून एक्झिट झालेली पाहायला मिळाली. यानंतर आता दुसरा आठवडा सुरु झाला असून सर्वच स्पर्धक उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. अशातच यंदाच्या सीझनमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून एका स्पर्धकाचे बोलणे साऱ्यांच्या नापसंतीस पडले. यंदाच्या या पर्वात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा झालेला अपमान अनेकांना खटकला. (Vishakha Subhedar On Bigg Boss Marathi 5)
वर्षा उसगांवकर यांच्यासाठी निक्की तांबोळीने वापरलेले शब्द, त्यांचा केलेला आदर अनेकांना खटकला. ज्येष्ठ अभिनेत्रीचा हा अपमान पाहून अवघा महाराष्ट्र खवळला. मराठी माणसाबद्दल केलेल्या विधानामुळे निक्कीने “आताच्या आता माझ्या मराठी माणसाची तुम्हाला माफी मागायला हवी” असेही रितेशने भाऊचा धक्कामध्ये सुनावले आणि त्यानंतर निक्कीने हात जोडून सर्वांची माफी मागितली. यामुळे तिला रडूही आले. त्यानंतर घरात जाऊन तिने पुन्हा एकदा वर्षाताईंची व इतर स्पर्धकांची वैयक्तिकपणे माफी मागितली.
यानंतर आता सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. याआधीही विशाखा यांनी पोस्ट शेअर करत त्यांचा खास मित्र पंढरीनाथ कांबळेला पाठिंबा दर्शविला. त्यावेळीही त्यांनी पॅडीला कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. यापाठोपाठ आता विशाखा यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा झालेला अपमान पाहून भाष्य केलं आहे. शिवाय त्यांनी जान्हवीच्या वर्तणुकीलाही टोकलं आहे.
विशाखा यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर करत, “आपण आपल्या इंडस्ट्री मधील जेष्ठ कलाकारांसमोर उभे जरी ठाकलो तरी त्यांचा आदर करणे, त्यांच्याशी आदराने बोलणे हा सभ्यपणा बाळगायलाच हवा. काल ही तेच झालं. निक्की तर मराठी कलाकारांपैकी मोडत नसावी पण जान्हवी तर मोडते. तरीही काय भाषा. वर्षा ताईंबद्दल किती काय काय बडबडते. फक्त भांडण नको की बॉस. किल्लेकरचा आवाज त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्यावा असा आहे. आणि धष्टपुष्ट मंडळी का तारसप्तकातला आवाज लावतात? Body चा इतका **? #बिगबॉसमराठी ५”, असं म्हटलं आहे.