Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रियाने सायलीच्या फोनवरुन पाठवलेल्या मॅसेजमुळे अर्जुनचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो. प्रियाने सायलीच्या फोनवरुन अर्जुनला भेटण्यासाठीचा मॅसेज केलेला असतो आणि तो मॅसेज डिलीटही केलेला असतो. त्यामुळे अर्जुन बागेत सायलीची वाट पाहत असतो. तर घरी सगळेचजण जेवायला आलेले असतात. प्रतिभा रविराज यांनाही जेवणासाठी आमंत्रण दिलेलं असतं. सायली सगळ्यांच्या आवडीनुसार जेवण करते. यावरुन तर पूर्णा आजी सायलीला ओरडते आणि सांगते की, ‘तू सगळ्यांना लाडावून ठेवलं आहेस. त्यानंतर सगळेजण जेवू लागतात. पनीरची भाजी चांगली केली असल्याचं अश्विन सांगत सायलीचं भरभरुन कौतुक करतो.
तर पूर्ण आजी मधु भाऊंना खीर वाढायला सांगते. या वेळेला सायली आश्रमातल्या बऱ्याचशा आठवणी सगळ्यांसमोर शेअर करताना दिसते. त्यानंतर रविराज प्रतिमा साठी नवा फोनही भेट म्हणून देतो. हे पाहून प्रतिमाही खुश होते आणि घरातले सगळेच खूप खुश होतात. तर प्रिया घराबाहेरून आत येते आणि म्हणते की, ‘मला सुद्धा जेवायला वाढ. मला सुद्धा भूक लागली आहे. त्यानंतर रविराजला बघून ती म्हणते की, ‘मी काही वेळ पूर्णा आजीकडे थांबले होते. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले’, हे ऐकल्यावर रविराज म्हणतो, ‘हिच्यावर आता विश्वास ठेवायचा की नाही हाच मोठा प्रश्न पडला आहे’.
रविराजचं बोलणं ऐकून प्रिया रागारागात जेवायला बसते. तर इकडे सायली अर्जुनची वाट बघत असते. अर्जुन बागेत सायलीची वाट बघत असतो. त्यानंतर अर्जुन स्वतःच कंटाळून घरी येतो आणि खोलीत सायलीला शोधू लागतो. खोलीत सायलीला पाहून तो विचारतो की, “तुम्ही आलात का नाही. तुम्ही मला बोलावलं त्या जागी आलात का नाही?”. यावर सायली म्हणते की, “मी तुम्हाला कधी बोलावलंय. मी तुम्हाला बोलावलं नाही”. हे ऐकून अर्जुन आणखी गोंधळतो आणि सायलीला बेडवर बसवतो.
आणखी वाचा – ‘Bigg Boss…’ फेम डीपीने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला, “फक्त वडिलांना…”
तो सायलीला विचारतो की, “तुमच्या मनात जे काही सुरु आहे ते आता इथे बोलून टाका. तुम्ही मला स्वतःच मॅसेज करुन सांगितलं होतं की, माझ्या मनातलं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे”, असं म्हणत अर्जुन पुराव्यासकट सायलीला तो मॅसेज दाखवतो. मात्र सायलीच्या फोनमध्ये तो मॅसेज नसतो. हे पाहून दोघांनाही धक्का बसतो. आता सायली व अर्जुन या मॅसेज प्रकरणाचा छडा लावणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.