बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मात्र सध्या ती व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलेली बघायला मिळते. स्वरा सध्या तिच्या घरातील एका लग्नामध्ये व्यस्त असलेली बघायला मिळत आहे. चाहत्यांबरोबर कार्यक्रमाची झलक ती शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कव्वाली एंजॉय करताना दिसत आहे. यामध्ये सगळे जण खूप धमाल करताना दिसत आहेत. तसेच स्वरा तिची मुलगी राबीया व पती फहाद अहमद यांच्याबरोबर दिसून आली. (swara bhaskar daughter video)
गुरुवारी स्वराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका मित्राच्या लग्नातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावेळी कव्वाली सादर करणाऱ्या टीमणए जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळी स्वराने डान्सदेखील केला. ती मुलीलादेखील कव्वालीमध्ये घेऊन गेली. स्वरा व अहमद यांनी एकत्र डान्सदेखील केला. दरम्यान याचवेळी स्वराच्या मुलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्वरा, अहमद व त्यांची मुलगी राबीया हे तिघंही कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहेत.
स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. अभिनयापासून दूर असली तरीही स्वरा सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी
स्वरा नवऱ्याबरोबरचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच मुलगी राबीयाबरोबरचेदेखील अनेक फोटो शेअर करताना ती दिसते. सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर ती देत असते. दरम्यान स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी राबीयाचे खूप कौतुकदेखील केले आहे.