Deepika Padukone Slams Lt Chairman Sn Subrahmanyan : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोन. दीपिका तिच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिकाच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर दीपिकाने तिच्या अभिनयानेही रसिकांच्या मनात घर केलं आहे. दीपिका व रणवीर बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. सध्या दोघेही त्यांच्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. दीपिका ही स्पष्टवक्ती अभिनेत्रींपैकी एक आहे. बरेचदा ती न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. अशातच अभिनेत्री एका मुद्द्यावरुन भडकली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेवरुन निघालेल्या या मुद्द्याला धरुन तिने चेअरमन यांचे चांगलेच कान पिळले आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या साऱ्यांच्या नजरेस पडली आहे.
‘एल अँड टी’ चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांच्यावर दीपिका पदुकोणने संताप व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे, असे निवेदन त्यांनी नुकतेच दिले होते. एसएन सुब्रमण्यन म्हणाले की, “कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम केले पाहिजे. या वक्तव्यावर दीपिका संतापली आणि दीपिकाने पोस्ट करत सुनावले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहून एसएन सुब्रमण्यन यांच्यावर टीका केली आहे. दीपिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर पत्रकार फैज डिसूझा यांची पोस्ट शेअर केली आणि त्यासह लिहिले की, ‘एवढ्या मोठ्या पदावर बसलेले लोक अशी विधाने करताना पाहून धक्का बसतो. मानसिक आरोग्य महत्त्वाचे”.

हे ज्ञात आहे की, कर्मचाऱ्यांशी नुकत्याच झालेल्या संभाषणात, एस.एन. सुब्रमण्यन यांना विचारण्यात आले की, त्यांची कंपनी कोट्यवधींची असताना शनिवारी ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम का करायला लावतात. यावर एसएन सुब्रमण्यन यांनी उत्तर दिले की रविवारी मी त्यांच्याकडून काम करुन घेऊ शकलो नाही याची मला खंत आहे. रविवारीही लोकांनी काम केले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. एसएन सुब्रमण्यन पुढे म्हणाले होते की, “कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम केले पाहिजे”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी
ते म्हणाले, “मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो नाही. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो तर मला जास्त आनंद होईल कारण मी रविवारी काम करतो. लोकांनी रविवारी ऑफिसला जावे. घरात राहून ते काय करतील आणि किती वेळ बायकोकडे टक लावून पाहतील?”. तेव्हापासून एसएन सुब्रमण्यम हे चर्चेत असून या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.