‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय आहे. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या हाताचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर येताच तिने बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला. संगीतकार कुणाल भगतबरोबर अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाहीर केल्यापासूनच अंकिताच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (ankita walawalkar wedding shopping)
अशातच अंकिता तिच्या लग्नाच्या खरेदीच्या तयारीला लागली आहे. अंकिता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सध्या ती लग्नासंबंधित अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. अंकिताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अंकिताच्या दोन्ही बहिणी साडी खरेदी करतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंकिता लग्नाआधीच्या बस्ताबांधणीला आपल्या दोन बहिणींबरोबर गेली असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. या व्हिडीओला तिने नेहा कक्करचे ‘वेडिंग दा सीझन है’ हे खास गाणंही लावलं आहे.

आणखी वाचा – “पप्पा जाऊन चार वर्षे झाली पण…”, वडिलांच्या आठवणीत रवी जाधव भावुक, म्हणाले, “त्यांची आठवण…”
काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि आता तिने लग्नाच्या खरेदीलाही सुरुवात केली आहे. सध्या ती कामातून वेळात वेळ काढत लग्नाची शॉपिंग करताना दिसत आहे. खरेदीचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे पोस्टही केले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने डीपीदादाबरोबर खरेदी करायला गेल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता कपड्यांच्या दुकानात शॉपिंग करताना दिसली होती.
आणखी वाचा – “हे खरंही असू शकतं आणि…” धनश्री वर्माबरोबरच्या नात्याबद्दल युजवेंद्र चहलचे थेट भाष्य, म्हणाला, “खूप वेदना…”
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मधून बाहेर आल्यापासून अंकिताच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना ती लग्नबंधनात कधी अडकणार यांची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणाल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे आता त्यांचे अनेक चाहते मंडळी लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.