टेलिव्हिजन अभिनेत्री सनी लिओनी हे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली बघायला मिळते. आजवर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या आयटम सॉन्ग्सना चाहत्यांची अधिक पसंती मिळाली आहे. अशातच आता एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये कमाल केलेली सनी सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. पण ती कोणत्या योजनांचा लाभ घेत आहे? आणि नक्की हे प्रकरण काय आहे? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. दरम्यान आता हे प्रकरण सनीच्या नावाने सुरु झालं आहे. तसेच या प्रकरणाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. (sunny leone on government scheme)
छत्तीसगडमध्ये सरकारी योजना सुरु केल्या आहेत. महिलांसाठीदेखील अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे महतारी वंदनमध्ये फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बस्तर जिल्ह्यातील एका योजनेमध्ये सनीच्या खात्यामध्ये १००० रुपये जमा करण्यात येत होते. याआधी बिहारमध्येही असे एक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान आता या आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आहे.
आणखी वाचा – अखेर अर्जुनने दिली प्रेमाची कबुली, एसटी स्टँडवर जाहीर घोषणा केली अन्…; प्रोमो व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचा खुलासा छत्तीसगडमधील बस्तर येथील तालूर गावामध्ये झाला आहे. एका व्यक्तीने फसवणुकीसाठी सनी लिओनीच्या नावाचा वापर केला. तसेच तिच्या पतीचे नाव म्हणून जॉनी सीन्सचे नावदेखील दिले गेले. या योजनेअंतर्गत विवाहित महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात. या प्रकरणी विरेन्द्र जोशी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत बस्तरचे जिल्हाधिकारी एस. हरीश यांनी सांगितले की, या संपूर्ण फसवणुकीची चौकशी करण्यासाठी बस्तर जिल्हाधिकाऱ्यांनी महिला आणि बाल विकास विभागाचे जिल्हा अधिकारी आणि बस्तर तहसीलदार यांची संयुक्त टीम तयार केली आणि या टीमने तलूर गावात पोहोचून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. तपासात दोषी आढळल्यास अंगणवाडी सेविका वेदमती कश्यप यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय महतरी वंदन योजनेच्या संपूर्ण हप्त्याची रक्कमही वीरेंद्र जोशी यांच्या खात्यात धरून वसूल केली जाईल.