हिंदी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. (shyam benegal funeral)
बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालविल्याचे पिया बेनेगल यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते.
श्याम बेनेगल यांना निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलकार उपस्थित राहिले होते. यावेळी सगळेच जण दु:खी असलेले दिसून आले. श्याम यांना निरोप देण्यासाठी नसीरुद्दीन शाह पत्नी रत्ना पाठक सहित पोहोचले होते. दोघंही खूप भावुक झालेले दिसून आले. तसेच अभिनेत्री दिव्या दत्तादेखील हजर राहिलेली दिसून आली.कवी जावेद अख्तरही भावुक झालेले दिसून आले. त्याचप्रमाणे श्रेयस तळपदेदेखील श्याम यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी पोहोचला होता. हिंदी चित्रपटातील अभिनेते कुलभूषण खरबंदादेखील पोहोचलेले दिसून आले. तसेच आनंग देसाईदेखील उपस्थित होते. बॉलिवूडमधील सगळेच जण खूप भावुक झालेले दिसून आले.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्रात शिक्षण घेतले. नंतर फोटोग्राफी सुरू केली. त्यांना बॉलीवूडमधील आर्ट सिनेमाचे जनक देखील मानले जाते. ते बारा वर्षांचे असताना त्यांनी त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी यांच्यासोबत काम केले. बेनेगल यांनी दिलेल्या कॅमेऱ्यावर पहिला चित्रपट बनवला. ‘अंकूर’, ‘निशांत’, ‘मंडी’, ‘मंथन’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘वेल डन अब्बा’ असे चित्रपट बनवले आहेत.