बॉलिवूडमध्ये सध्या सनी लिओनि हे नाव खूप चर्चेत आहे. २०१२ साली तिने ‘जिस्म २’ या चित्रपटामधून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटामधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. ‘जॅकपॉट’, ‘राघिणी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘वन नाइट स्टँड’ व ‘तेरा इंतजार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली. याव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग देखील केले असून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या सनी खूपच कमी प्रमाणात पडद्यावर दिसून येते. (mahesh bhatt on sunny leone)
दरम्यान सनीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर रणदीप हुड्डादेखील होता. यामध्ये रणदीपबरोबर सनीचे अनेक रोमॅंटिक सीन शूट केले होते. मात्र हे सीन चित्रित करताना सनी खूप अवघडली होती. याविषयी महेश भट्ट यांनी सांगितले आहे. त्यांनी ‘IANS’बरोबर बोलताना सांगितले की, “मला माहीत होतं की सनी खूप लाजरी आहे. ती पॉर्नस्टार असली तरीही तिने लाजणं सोडलं नाही. रणदीपबरोबर काही सीन चित्रित करताना तिला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. जे दिसतं तसं नसतं. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. प्रत्येक सैनिक बहादूर नसतो. तसेच प्रत्येक अडल्ट स्टार बोल्ड नसतो. कधी कधी खरं काहीतरी वेगळं असतं”.
जेव्हा सनी ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात होती तेव्हा महेश यांनी सनीला ‘जिस्म २’ साठी साईन केलं होतं. यावर सनीने देखील भाष्य केलं होतं. ती म्हणाली की, “अनेकांना वाटतं की मी खूप लोकांबरोबर काम केलं आहे पण असे नाही. या चित्रपटाच्या आधी मी कोणाला अनोळखी व्यक्तीला किस केलं नाही. पण माझ्याबद्दल खूप जण वेगळा विचार करतात. पण ‘जिस्म २’ हा माझा पहिला चित्रपट होता. त्यामध्ये मला अनोळखी व्यक्तीला किस करायचे होते”.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने आतापर्यंत जॅकपॉट, शूटआउट एट वडाला, रागिनी एमएमएस 2, हेट स्टोरी 2, वन नाइट स्टँड, नूर, रईस, अर्जुन पटियाला या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आता ती रंगीला, शेरो, हेलेन, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव व कोकाकोला याचित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.