Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पार पडताना दिसत आहे. कॅप्टन्सी कार्यात जोरदार राडा पाहायला मिळत आहे. आजच्या भागात कॅप्टन होण्यासाठीचा टास्क पाहायला मिळणार आहे. कॅप्टन होण्यासाठी धनंजय, सूरज, वर्षा आणि अरबाज हे दावेदार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या चौघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणाचं गोड पाणी, कोणाची तहान भागवणार, हे पाहावं लागणार आहे. यामध्ये सूरज, वर्षा आणि अरबाज यांना दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याची संधी चालून आली आहे, तर धनंजय पहिल्यांदा कॅप्टन होण्याच्या शर्यतीत कायम राहिला आहे. त्यामुळे कॅप्टन्सीचा प्रत्येक दावेदार घरातील इतरांना मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
अशातच अरबाज घरातील निक्की व जान्हवी यांना त्याला कॅप्टन पद मिळावे म्हणून प्रयत्न करताना दिसणार आहे. याचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यात निक्की व जान्हवी अरबाजला त्यांच्या म्हणण्यानुसार वागायला सांगतो आणि अरबाजवागतोदेखील. यावेळी निक्की अरबाजलाअ उठबशा काढायला सांगते आणि जान्हवी त्याला त्याच्याबरोबर flirt करायला सांगते. यावेळी निक्की अरबाजला त्याच्या वागण्याबद्दल उठाबशा काढायला सांगते आणि अरबाज तिच्यासाठी दहा उठाबशा काढतोदेखील
यावेळी ती त्याला “पुन्हा माझ्यावर रुसशील का? असं म्हणते आणि मग अरबाज तिला पाणी प्यायला देतो. त्यानंतर अरबाज जान्हवीला मनवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जान्हवी त्याला असं म्हणते की “तू माझ्याशी flirt कर”. तेव्हा अरबाज तिच्याबद्दल असं म्हणतो की, “जान्हवी, तुझे डोळे किती सुंदर आहेत. तुझ्या डोळ्यांत बघून मला असं वाटत आहे की मी हरवून जावं आणि परत येऊ नये. इतके तुझे डोळे सुंदर आहेत. मी तुझ्या डोळ्यांतून तुझ्या मनात जाऊ शकतो”
दरम्यान, कॅप्टन पदाच्या उमेदवाराच्या भांड्यातील पाणी पिण्याचा टास्क असल्याचं दिसून येत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये वर्षा घरातील सदस्यांना म्हणतेय आपली तहान भागवा. अरबाज म्हणतो, हे खूप गोड पाणी आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्यात या घराला नवीन कॅप्टन मिळणार आहे, याआधी अंकिता, अरबाज, वर्षा, निक्की व सूरज यांनी कॅप्टनपदाचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे आता या आठवड्यात या घराला कोणता नवीन कॅप्टन मिळणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.