शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात कॅप्टन्सी टास्कवरुन पॅडी कांबळेंनी वर्षा यांना चांगलंच सुनावलं, म्हणाले, “त्यांच्याबरोबर स्ट्रॅटेजी बनवता आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 20, 2024 | 9:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo captaincy task paddy aka pandharinath kamble and varsha usgaonkar fight

Bigg Boss Marathi च्या घरात कॅप्टन्सी टास्कवरुन पॅडी कांबळेंनी वर्षा यांना चांगलंच सुनावलं, नक्की काय म्हणाले...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी नुकताच एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘टीम ए’मध्ये अरबाज, निक्की, सूरज, धनंजय आणि वर्षा यांचा समावेश होता. तर, ‘बी टीम’मध्ये अंकिता, पॅडी, अभिजीत, जान्हवी आणि संग्राम हे पाच सदस्य होते. त्यामुळे या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार? याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर या खेळात ‘टीम ए’नेच बाजी मारली. पहिल्या डावात अंकिता, पॅडीला सहज बाद करण्यात आलं. यानंतर धनंजयने दुसऱ्या फेरीत जान्हवी, संग्रामला बाद केलं. तिसऱ्या लढतीत संग्रामने टीमच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

यामुळे या डावात संग्राम-अरबाजमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. पण, शेवटी अरबाजने संपूर्ण ताकदीनिशी सर्वांना बाजूला काढलं आणि अभिजीतच्या घरट्यात अंड ठेवून त्याला बाद केलं. त्यामुळे ‘टीम बी’मधील सगळे सदस्य बाद झाले असून ‘टीम ए’मधील निक्की सोडून वर्षा, अरबाज, सूरज व धनंजय हे कॅप्टन्सीच्या पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे यांच्यात अंतिम लढत होऊन कुणी तरी एक या घरचा नवीन कॅप्टन होणार आहे आणि नुकताच याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : अंगण, साधी मांडणी, कौलारु टच अन्…; कणकवलीमध्ये इतकं साधं व सुंदर आहे तितिक्षा तावडेचं घर, व्हिडीओ व्हायरल

या नवीन प्रोमोमध्ये कॅप्टन्सीच्या सदस्यांना बाकीच्यांची तहान भागवायची आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपले पाणी पिण्याची विनंती घरातील सदस्यांना करतानाचे यात पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमधून निक्की-अरबाज यांच्यात पुन्हा बाचाबाची होणार की काय? असं दिसत आहे. यात अरबाज “मी खूप गोड पाणी आहे” असं म्हणताच निक्की त्याला सुनावत असं म्हणते की, “कालपर्यंत तू कडू होता आणि आता अचानक तू गोड कसा काय झाला?”.

आणखी वाचा – 20 September Horoscope : शुक्रवारचा दिवस ‘या’ राशीच्या लोकांसाठी आर्थिक कसोटीचा, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…

तर पुढे पॅडी वर्षा यांना असं विचारतो की, “तुम्हाला विश्वास होता की आम्ही खेळू म्हणून…” यावर वर्षा “हो… असं वाटलं होतं” हे उत्तर देतात.पुढे पॅडी वर्षा यांना सुनावत असं म्हणतात की, “तुम्ही स्ट्रॅटेजी बनवायला त्यांच्याबरोबर बसता आणि विश्वास आमच्यावर ठेवता…” त्यामुळे आता वर्षा व पॅडी यांच्यात यामुळे मोठा वाद होणार का? या घराला नवीन कॅप्टन कोण मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Tags: bigg boss marathi 5Pandharinath Kamblevarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Subodh Bhave son won a gold medal in a football tournament

सुबोध भावेच्या लेकाची फुटबॉल स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, कौतुक करत म्हणाला, "तू आणि तुझी संपूर्ण टीम..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.