बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. खूप कालावधीपासून असणाऱ्या बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर ती लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीच्या लग्नावरुन मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. सोनाक्षी हिंदू व जहीर मुसलमान असल्याने दोघांच्याही लग्नामध्ये खूप अडथळे आले होते. सोनाक्षीच्या घरचेदेखील तिच्या लग्नासाठी तयार नव्हते अशीदेखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले होते. सोनाक्षी ज्यामध्ये खुश आहे त्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर सोनाक्षी व जहीर यांचे लग्न थाटामाटात पार पडले. पण या लग्नामुळे सोनाक्षीच्या वडिलांच्या प्रेमकहाणीची चर्चादेखील ऐकायला मिळाली. (sonakshi sinha on shhatrughna sinha extra marital affair)
शत्रुघ्न यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटात काम करत असताना त्यांचे नाव अभिनेत्री रिना रॉय यांच्याबरोबर अनेकदा जोडले गेले. ते रिना यांच्यावर प्रेम करत असत. मात्र त्याचवेळी शत्रुघ्न यांची ओळख पुनम सिन्हा यांच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शत्रुघ्न व पुनम यांनी लग्नदेखील केले. मात्र ते पुन्हा एकदा रिना यांच्याकडे गेले. त्यांच्या विवाहबाह्य संबंधावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यावर सोनाक्षीनेही भाष्य केले होते.
काही काळापूर्वी सोनाक्षीने एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न यांच्या विवाहबाह्य संबंधावर भाष्य करत म्हणाली की, “हे सगळं तेव्हा झालं होतं जेव्हा माझा जन्मदेखील झाला नव्हता. मी जेव्हा मोठी झाले तेव्हापासून मला सगळं समजायला लागलं. पण मी माझ्या वडिलांच्या खूप वर्षांपूर्वी झालेल्या चुकीमुळे मी सुळावर नाही चढवू शकत. त्यांचा तो भूतकाळ होता. त्यामुळे मी यावर जास्त लक्षही देत नाही आणि विचारदेखील करत नाही. काही लोकांसाठी हे केवळ एका हेडलाइनसाठी असेल मात्र माझं ही कुटुंब आहे”.
सोनाक्षी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आली होती. त्यावेळी तिचा चेहरा रिना यांच्याशी साधर्म्य साधणारा होता. यावरुनही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र ती आईसारखी दिसत असल्याचे सोनाक्षीने स्पष्ट केले होते.