मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हरीशची फसवणूक केल्याने दिशा-दामिनी सापडणार आदित्यच्या तावडीत?, अहिल्यादेवींसमोर ऍडशूटचं सत्य येणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
paaru serial update

हरीशची फसवणूक केल्याने दिशा-दामिनी सापडणार आदित्यच्या तावडीत?, अहिल्यादेवींसमोर ऍडशूटचं सत्य येणार का?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारूने सावित्री आत्याला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. पारूचं हे बदलतं विश्व पाहून सावित्री आत्यालाही काळजी वाटू लागते. ती तिला आराम करायला सांगून बंगल्यात निघून जाते. तर इकडे दामिनी किचनमध्ये आलेली असते आणि अस्थावस्था पडलेली भांडी पाहून आरडाओरडा करु लागते आणि पारू व सावित्रीला आवाज देते. तितक्यात अहिल्यादेवी तिथे येतात आणि सांगतात की, कशाला तू आरडाओरडा करत आहेस. यावर दामिनी म्हणते की मला आपल्या किचनची ही अवस्था पाहत नाही आहे. सावित्री व पारूचं लक्षच नाही आहे. आता हे आपल्याला घाबरतही नाही आहेत. (paaru serial update)

हे ऐकून अहिल्यादेवी काहीच बोलत नाही तेव्हा दामिनी सावित्रीला ओरडू लागते तेव्हा सावित्री सांगते की, मी पारुला घरी सोडायला गेले होते. तिच्या हाताला भाजलं आहे त्यामुळे तिला काहीच काम करता येत नव्हतं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी तिथून निघून जातात सावित्री ते किचन आवरू लागते. तर दामिनी तिकडून निघून जाते त्यानंतर इकडे अहिल्यादेवी पारूच्या हाताला मलम लावताना दिसतात. भाजलेल्या हातांना त्या मलम लावत असतात तेव्हा पारु झोपलेली असते. तितक्यात मारुती व गनीसुद्धा येतो. अहिल्यादेवी काळजी घे असं सांगत तिथून निघून जातात. त्यानंतर सकाळी पारू तयार होऊन बंगल्यात जायला निघते तेव्हा मारुती म्हणतो अग आराम कर. तेव्हा पारू सांगते की, आता माझे हातसुद्धा बरे झाले आहेत.

आणखी वाचा – रुपालीच्या प्रतिबिंब शक्तीचा शेखरला संशय, विरोचकाच्या शक्तीपासून नेत्राच्या बाळासह राजाध्यक्ष कुटुंबीय वाचणार का?

तू रात्री माझ्या हाताला मलम लावलंस ना?, यावर गनी व मारुती हसायला लागतात आणि सांगतात की, मी नाही अहिल्यादेवी आलेल्या आणि त्यांनी तुझ्या हाताला मलम लावलं. हे ऐकल्यावर पारूला रडू येतं. पारू बंगल्यात जाते आणि थेट अहिल्या देवीच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते की, साक्षात काल माझ्या घरी देव आला होता आणि मी झोपले होते. तुम्ही माझ्या हाताला मलम लावलं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि पारूला रडू येतं. माझ्या दारात सवाशीण आली होती तरीसुद्धा मी तिला हळद-कुंकूसुद्धा लावलं नाही आणि तिला असंच पाठवून दिलं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी म्हणतात की, मी काल मालकीण नाही तर माणुसकीचा धर्म जपला आणि असं म्हणत तिथून जात हळदी-कुंकवाचं ताट घेऊन येतात आणि सांगतात की, तुझी मला हळद-कुंकू लावण्याची इच्छा आहे ना?, तर तू मला लाव. तिला त्या असेही म्हणतात की, हरीशबरोबर ऍडशूटसाठी लग्न झालं तेव्हापासून तुझ्यात थोडीशी समज आली आहे. हे ऐकल्यावर सगळेजण शांत बसतात त्यानंतर प्रीतम आदित्य हरीशला कोणी फसवलं याचा शोध घेत असतात. तेव्हा प्रीतमने सगळ्यांची एक मीटिंग ठेवलेली असते. त्या गडबडीत तो असतो. तेव्हा पारू त्याला नाश्ता करण्यासाठी सांगते. मात्र प्रीतम सांगतो की मी आता गडबडीत आहे मी त्या लोकांची मीटिंग ठेवली आहे. त्यामुळे मला आता काही जमणार नाही, असं म्हणून तो घाईघाईत निघून जातो.

आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो समोर

आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशा दामिनीला सांगते की, आदित्य हरीशची फसवणूक कोणी केली याचा शोध घेत आहे. उद्या तुझं नाव कळालं तर तुझी काही खैर नाही. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आदित्य समोर हे सगळं सत्य येणार का?, अहिल्यादेवींना हे सगळं सत्य समजणार तेव्हा काय होणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Shatrughan Sinha expressed his reaction on Sonakshi and Zaheer Iqbal's marriage. Know more

आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, "झहीरबरोबर ती…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.