सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रशस्त हॉल, भारतीय पद्धतीची बैठक अन्…; ‘मुरांबा’ फेम स्मिता शेवाळेचं घर आहे इतकं सुंदर व आकर्षक, Inside Video

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Smita Shewale home

प्रशस्त हॉल, भारतीय पद्धतीची बैठक अन्…; 'मुरांबा' फेम स्मिता शेवाळेचं घर आहे इतकं सुंदर व आकर्षक, Inside Video

‘मुरांबा’ या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. स्मिताने या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत तिच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. परंतु काही दिवसांपुर्वीच तिने या मालिकेतून निरोप घेतला असल्याचं समोर आलं. अभिनेत्रीने आपल्या मुलासाठी ही मालिका सोडल्याचं सांगितलं होतं आणि मुंबईत मुलाची काळजी घेणारं कोणी नसल्याने तिने पुण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने तिच्या कौटुंबिक कारणामुळे ही मालिका सोडली आहे. (Smita Shewale home)

अशातच स्मिताने तिच्या युट्युब चॅनेलवर तिच्या पुण्यातील घराचा होम टूरचा व्हिडीओ शेअर केला. स्मिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या पुण्याच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. स्मिताचं पुण्यात दोन bhk चं घऱ आहे. आणि या प्रशस्त घरात ती तिच्या मुलासह राहते. स्मिताच्या घरातील प्रशस्त हॉल आणि त्यात असलेली भारतीय बैठक लक्ष वेधून घेत आहे. हॉलमध्ये असलेल्या सुंदर अशा बुक शेल्फने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – असं झालं होतं शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेचं लग्न, चार महिने पूर्ण होताच शेअर केला Inside Video

इतकंच नव्हे तर जमिनीवर असणार कॉलरफूल bed runner विशेष खास आहे. शिवाय स्मिताच्या घराला ऐसपैस बाल्कनी असलेली पाहायला मिळत आहे. यानंतर घरातील महत्तवाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. स्मिताने तिच्या घरातील स्वयंपाक घरामध्येही अगदी पद्धतशीर गोष्टी ठेवल्या असल्याचं पाहायला मिळत आहेत. या घरात दोन बेडरुम असून दोन्ही बेडरुम तिने सुंदर रित्या आणि मनाचा विचार करुन सजवलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – विराट कोहली व अनुष्का शर्माची मुलं असणार सगळ्यात श्रीमंत स्टारकिड्स, थक्क करणारी आहे दोघांची कमाई, कसे कमावतात पैसे?

या दरम्यान लक्ष वेधलं आहे ते स्मिताच्या स्टुडीओ रुमने. स्मिताच्या स्टुडीओ रुममध्ये मन प्रसन्न करणारा असा देव्हारा पाहायला मिळत आहे आणि याचसह या रुममध्ये सुंदर ड्रेसिंग टेबलही पाहायला मिळत आहे. स्मिताने तिचं सुंदर असं छोटंसं घर तिला हवं तस सजवलं आहे. सध्या स्मिता तिच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत तिच्या लेकाला वेळ देत आहे.

Tags: marathi actressmurambasmita shewaleSmita Shewale home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update What is the real secret of the cloth given by Trinayana Devi to netra

त्रिनयना देवीने नेत्राच्या ओटीत दिलेल्या वस्त्राचं नेमकं रहस्य काय? देवी आई लेकींना नवीन मार्ग दाखवणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.