मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईची साडी, दागिने अन्…; सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील खास लूकची चर्चा, अवाढव्य खर्च न करता साधेपणाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2024 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding

आईची साडी, दागिने अन्…; सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील खास लूकची चर्चा, अवाढव्य खर्च न करता साधेपणाने वेधलं लक्ष

तब्बल सात वर्ष एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी अखेर लग्नगाठ बांधली आहे. बरेच दिवसांपासून सोनाक्षी व झहीरच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत सोनाक्षी व झहीर हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. २३ जून रोजी त्यांच्या रिलेशनशिपला सात वर्ष पूर्ण होताच त्यांनी लग्न केले आहे. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व सिनेसृष्टीतील मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले. (Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding)

सोनाक्षी व झहीर नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्नबंधनात अडकले आहेत. २३ जून २०१७ रोजी या जोडीने त्यांच्या नात्याला सुरुवात केली. अखेर सात वर्षांनी त्यांनी कुटुंबाच्या समवेत शाही लग्न केले. सोनाक्षी व झहीर यांनी अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा उरकला. नोंदणी पद्धतीने लग्न करताना त्यांनी ना कोणताच अवाढव्य खर्च वा ना भरजरी कपडे परिधान केले होते. घरच्या घरीच त्यांनी ही विधी पार पाडली.

आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

लग्नासाठी सोनाक्षीने पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होतं. तर झहीरने पत्नीच्या साडीला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. त्याच्या सदऱ्यावरही सुंदर असं नक्षीकाम केलं होतं. या सगळ्यात सोनाक्षीच्या सुंदर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण ही खास साडी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची होती. यावर भरजरी दागिने न घालता तिने नाजूक असा एक हार घातला होता. आणि केसात पांढऱ्या रंगाची फुलं माळली होती. आईची सुंदर अशी साडी, दागिने यांमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.

आणखी वाचा – अर्जुन चैतन्यवर मोठं संकट, वकिलांमार्फत महिपतने आखला नवा डाव, आश्रम केसचं नक्की काय होणार?

सोनाक्षी व झहीरच्या लग्नातील बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहतेमंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. दोघेही त्यांच्या लग्नात खूप खुश असल्याचेही दिसले. शिवाय सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा हेदेखील लेकीचं लग्न एन्जॉय करताना दिसले.

Tags: entertainmentsonakshi sinha motherSonakshi Sinha WeddingSonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Marathi singer Ketaki Mategaonkar answered fan’s question about singing English songs know more

“आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.