अभिनेत्री सोनक्षी सिन्हा ही तिच्या लग्नामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यापासूनच ती दुसऱ्या धर्मात लग्न करत असल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. लग्नानंतर सोनाक्षी मुस्लिम धर्म स्वीकारणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.मात्र आता ती मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही असे समोर आले आहे. याबद्दलचा खुलासा जहीरचे वडील रतनसी यांनी केले आहे. ते कोणत्या पद्धतीने लग्न करणार आहेत हे देखील सांगितले आहे. (sonakshi sinha religon change)
गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी व जहीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तसेच कुटुंबामध्ये ताणतनाव असल्याचेही बोलले जात होते. यावरुन शत्रुघ्न सिन्हा यांनीही घरात वातावरण बिघडल्याचे सांगितले होते. मात्र आता सर्व सुरळीत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे आता सोनाक्षीच्या लग्नात घरातील सगळे सदस्य हजर असतील असेही ते म्हणाले.
यावरुन जहीरच्या वडिलांनी दोघांच्याही लग्नाबद्दल सांगितले की,“यामध्ये हिंदू किंवा मुसलमान असे काही नाही आहे. हिंदू किंवा मुस्लिम अशा कोणत्याही पद्धतीने लग्न होणार नाही. हे लग्न नोंदणी पद्धतीने होणार आहे”.त्यानंतर सोनाक्षीने मुस्लिम धर्म स्वीकार करण्याबाबत सांगितले की, “सोनाक्षी धर्म बदलणार नाही. ते मनाने एकत्र येत आहेत आणि त्यामध्ये धर्माची काहीही भूमिका नाही. आम्हाला माणुसकीवर विश्वास आहे. देवाला हिंदू लोक देव म्हणतात तर मुसलमान अल्लाह म्हणतात. पण आपण माणसं आहोत. जहीर व सोनाक्षीला माझा आशीर्वाद आहे”.
नुकताच सोनाक्षी व जहीरचा हळदी व मेहंदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडले आहेत. या सर्व समारंभांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईमध्ये दोघांचे लग्न होणार असून यासाठी मित्रमंडळी व घरचे सदस्य असणार आहेत. तसेच कलाकार मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत.