बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोनाक्षी २३ जून २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबांधनात अडकली. तिच्या लग्नाच्या वेळी मित्र-मंडळी व कुटुंबिय उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील एका हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजनही केले होते. या पार्टीसाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर त्यांचे हनीमूनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील दर्शवली होती. त्यांच्या लग्नाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. यावेळी झहीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (zaheer iqbal on shatrughan sinha)
सध्या सोनाक्षी व झहीर यांच्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. नुकताच झहीरची एक मुलाखत समोर आली आहे. यामध्ये तो सोनाक्षी व त्याचे लग्न ठरतानाचा एक प्रसंग समोर आला आहे. तो म्हणाला की, “मी जेव्हा लग्नासाठी सोनाक्षीचा हात तिच्या वडिलांकडे मागायला गेलो होतो. लग्नासाठी त्यांची परवानगी घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. ते नकार देतील म्हणून मला भीती वाटत होती. पण जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा खूप छान वाटले. शत्रुघ्न सर हे खूप प्रेमळ व दयाळू आहेत”.
पुढे तो म्हणाला की, “मी त्यांच्यासमोर खूप घाबरून बोलत होतो. मी त्यांना सोनाक्षीने माझ्याबद्दल काही सांगितले आहे का? असे विचारले. त्यावर ते म्हणाले की, हो. तिने तुमच्याबद्दल सांगितले आहे. त्यावर मी शांत झालो आणि त्यांना स्पष्टच बोललो की, सर मी सोनाक्षीला लग्नासाठी मागणी घालण्याचा विचार करत आहे. त्यावर ते खुश होऊन म्हणाले, मस्त. खूप छान”.
त्यानंतर तो म्हणाला की, “सर, तुम्हाला मला काही विचारायचे असेल तर विचारु शकता. त्यांनंतर आम्ही एक तास गप्पा मारत होतो. त्यांना मी आवडलो. पण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा घाबरलो होतो. माझे शरीर खूप कापत होते. पण मी हिंमत केली आणि सोनाक्षीचा हात त्यांच्याकडे मागितला”.झहीर व सोनाक्षी हे लग्नानंतर आता पुन्हा कामाकडे वळले आहेत. नुकताच सोनाक्षी ‘काकुडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.