रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : श्रद्धा कपूरने चक्क कॅमेऱ्यामॅनकडूनच मागितला पिझ्झा, स्वतः हातात घेऊनही गेली, अभिनेत्रीची वागणूक पाहून लोक म्हणाले, “ही किती…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shraddha kapoor viral video

Video : श्रद्धा कपूरने चक्क कॅमेऱ्यामॅनकडूनच मागितला पिझ्झा, स्वतः हातात घेऊनही गेली, अभिनेत्रीची वागणूक पाहून लोक म्हणाले, "ही किती…"

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचे नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या सहजसुंदर अभिनयाने श्रद्धा सतत चर्चेत असते. ‘लव्ह का दी एंड’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. पण ‘आशिकी २’ या चित्रपटाने तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूरही दिसला होता. ही जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते पण आता ती चर्चेत येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. (Shraddha kapoor viral video)

श्रद्धाचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती कॅमेरामॅनबरोबर मस्ती करताना दिसत आहे. श्रद्धाने एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. ती बाहेर पडत असताना अचानक तिची नजर तिथे असलेल्या कॅमेरामॅनवर पडते. ते सर्वजण पिझ्झा खात असतात. तिथे जाऊन श्रद्धा त्यांना “काय खात आहात?” असे विचारते आणि “भूक लागली होती” असे म्हणते.

आणखी वाचा – ‘महाभारत’ मालिकेत ‘कुंती’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री आता कसं आयुष्य जगते?, चित्रपटांमध्ये काम करणंही सोडलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्यावर त्यांना ती विचारते, “अजून एक आहे का?”, ती केवळ एक घास मागते. पण कॅमेरामॅन तिला पूर्ण पिझ्झा तिला देऊ करतात. त्यावर ती विचारते, “नक्की मी घेऊ?” , त्यावर कॅमेरामॅन म्हणतात, “हो नक्की, इथे खूप आहेत”. श्रद्धाच्या या वागण्यावर तिथे असलेले सगळेच खूप खुश होतात आणि तिचे कौतुकही करतात. यावेळी ती एका पिच रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये दिसून आली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोरच काढावे लागले होते संपूर्ण कपडे, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेल्या, “टॉपलेस होताना…”

श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या स्वभावाचे अनेकांनी खूप कौतुक केले आहे. तर काही जणांनी तिच्या या वागण्यावर आक्षेप दर्शवला असून ओव्हरॲक्टिंग करत असल्याचे म्हंटले आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, “ही खूप निस्वार्थी आहे”, दुसरा नेटकरी म्हणाला की, “ही किती गोड आहे”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “हीला नेहमी ओव्हरॲक्टिंग करायची असते. श्रद्धाच्या या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Tags: bollywood actresscute actresspaparaazishraddha kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aishwarya Sharma Pregnancy Rumours

'बिग बॉस १७' फेम ऐश्वर्या शर्मा गरोदर?, 'डान्स दिवाने'च्या सेटवर अचानक बेशुद्ध पडली अन्…; चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.