‘बिग बॉस’ हिंदीचं १७वं विशेष गाजलं. या पर्वात दोन जोड्यांनी एंट्री करत हे पर्व विशेष गाजवलं. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिचा पती विकी जैन यांच्यासह सहभाग घेतला होता. तर अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिने तिच्या पतीसह म्हणजेच अभिनेता निल भट्टसह सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस १७’मुळे ऐश्वर्या शर्मा प्रसिद्धीच्या झोतात आली. अशातच अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Aishwarya Sharma Pregnancy Rumours)
नुकतीच अशी बातमी समोर आली होती की, ऐश्वर्या ‘डान्स दिवाने’च्या सेटवर अचानक बेशुद्ध पडली. यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. मात्र, नंतर ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, “ती पूर्णपणे बरी आहे, काळजी करण्यासारखे काही कारण नाही”. यानंतर आता पुन्हा एकदा ऐश्वर्याबाबत एक बातमी समोर आली असून या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या शर्मा गरोदर आहे. लवकरच नील भट्ट व ऐश्वर्या त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. सध्या दोघेही एकमेकांसह क्वालिटी टाइम घालवत आहेत आणि प्रेग्नेंसीची बातमी गुप्त ठेवू इच्छित आहेत. अर्थात नील किंवा ऐश्वर्याने या बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी आता या बातम्यांचे अपडेट्स येऊ लागले आहेत.
ऐश्वर्याशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीची बातमी निव्वळ अफवा आहे. ती गरोदर नाही. याआधीही तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्यावेळी अभिनेत्री म्हणाली होती की, “तिला कुटुंबाला नक्कीच पुढे न्यायचे आहे”. बरं, यावेळीही ऐश्वर्या तिच्या गरोदरपणाच्या बातमीवर लवकरच प्रतिक्रिया देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘गम है किसी के प्यार में’ मधून ऐश्वर्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यादरम्यान तिची भेट नील भट्टशी झाली आणि दोघेही एकमेकांना डेट करु लागले. यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले.