अभिनेते शशी कपूर यांचे नाव दिग्गज अभिनेत्यांमध्ये आवर्जून घेतले जाते. शशी यांच्या राजबिंड्या रुपावर अनेक तरुणी भाळल्या होत्या. त्यांनी १९६१ साली ‘धरमपुत्र’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या समोर आले. त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुकही करण्यात आले होते. अशातच अभिनेत्री सिम्मी गरेवाल यांनी शशी कपूर यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. (Simmi garewal on Shashi Kapoor)
असीम छाब्रा यांचे पुस्तक ‘Shashi Kapoor : The Householder, The Star’ या पुस्तकामध्ये सिम्मी यांनी एक किस्सा सांगितला आहे. १९७२ मध्ये आलेल्या ‘सिद्धार्था’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये शशी व सिम्मी हे एकत्रित भूमिका करताना दिसत होते. त्यावेळी सिम्मी या कपड्याशिवाय एक सीन चित्रित करायचा होता. पण त्या खूप अनकन्फर्टेबल होत्या. त्यावेळी शशी यांनी त्यांना कसे सांभाळले हे सांगण्यात आले आहे.
सिम्मी यांनी सांगितले की, “हा सीन करताना मी खूप अस्वस्थ होते. त्यानंतर मी कमरेखाली बॉडी स्टॉकिंग घातले. पण मला टॉपलेस व्हायचे होते तेव्हा मात्र मला खूप टेंशन आले. मी डोळे वर करुन पाहू शकत नव्हते. तेव्हा शशी यांना माझ्या परिस्थितीची जाणीव झाली. मला ते म्हणाले की, ‘लाजायची गरज नाही, तुम्ही खूप सुंदर आहात’, त्यांचे हे बोलणे ऐकूनच माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि मी सीन शूट केला”.
शशी कपूर हे दिसायला एकदम देखणे असल्याने त्यांना अनेक महिला पसंत करत होत्या. यामध्ये अभिनेते ऋषि कपूर यांच्या पत्नी व अभिनेत्री नितू कपूर यांनी शशी कपूर यांच्याबद्दल खुलासा केला होता. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या सीजनमध्ये नितू उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनी ऋषि कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की “एकेकाळी मला शशी फार आवडायचे”. नितू यांनी हा खुलासा केल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते.